Shreya Maskar
उत्तर गोव्यात चापोरा किल्ला वसलेला आहे. येथे हिंदी चित्रपट 'दिल चाहता है' चे शूटिंग झाले आहे.
चापोरा किल्ला, चापोरा नदी आणि अरबी समुद्राच्या विहंगम दृश्यांसाठीही ओळखला जातो.
चापोरा किल्ला पोर्तुगीजांनी १६१७ मध्ये बांधला होता. मराठा आणि सावंतवाडी यांच्या आक्रमणांपासून उत्तर गोव्याच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी चापोरा नदीच्या काठावर बांधण्यात आला.
चापोरा किल्ला मूळतः विजापूर सल्तनतचा मुस्लिम शासक आदिलशाह याने बांधला होता. त्यानंतर १६१७ मध्ये पोर्तुगीजांनी तो ताब्यात घेतला आणि त्याचे एका मोक्याच्या लष्करी चौकीत रूपांतर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पुनर्बांधणी केली.
चापोरा किल्ला ज्या द्वीपकल्पावर तो वसलेला आहे, त्या भूभागाच्या नैसर्गिक आणि तीव्र उतारांना अनुसरून त्याची रचना करण्यात आली आहे.
शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी १६८३ मध्ये पोर्तुगीजांकडून हा किल्ला जिंकून घेतला आणि वसाहतवादाचा विस्तार तात्पुरता रोखला.
मुंबईहून ट्रेनने प्रवास करून थिविम रेल्वे स्टेशनला उतरा. पुढे किल्ल्यापर्यंत टॅक्सी किंवा रिक्षाने जा.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.