Shreya Maskar
चिपळूण शहरापासून सुमारे १० किमी अंतरावर गोवळकोट किल्ला वसलेला आहे. गोवळकोट किल्ल्याला 'गोविंदगड' म्हणूनही ओळखले जाते.
गोवळकोट किल्ला वाशिष्ठी नदीच्या दक्षिण तीरावर वसलेला एक ऐतिहासिक ठिकाण आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी देवी कारंजेश्वरीचे एक छोटेसे मंदिर आहे.
गोवळकोट किल्ला मराठा साम्राज्य व जंजिऱ्याचे सिद्दी यांच्यात वारंवार बदललेल्या सत्तेच्या समृद्ध इतिहासासाठी प्रसिद्ध आहे. येथे प्राचीन तोफा आणि संरक्षणासाठीच्या गुप्त खंदकांचे अवशेष पाहायला मिळतात.
गोवळकोट किल्ल्यावर जाण्यासाठी १५-२० मिनिटांत पूर्ण करता येण्याजोगा एक सोपा गड-किल्ला ट्रेक आहे.
गोवळकोट किल्ला हा एक लहान डोंगरावरील किल्ला आहे. किल्ल्याच्या तीन बाजूंना वाशिष्ठी नदी आहे आणि चौथ्या बाजूला खोल खंदक आहे.
गोवळकोट किल्ल्यावर जाण्यासाठी मुंबईहून चिपळूणपर्यंत ट्रेनने प्रवास करा. पुढे रिक्षा किंवा बसने गोवळकोट किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचाल.
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६० मध्ये गोवळकोट किल्ला जिंकून त्याचे नाव 'गोविंदगड' असे ठेवले. कोकण प्रदेशात वाशिष्ठी नदीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला मराठ्यांचे एक मोक्याचे ठाणे बनला होता.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.