Shreya Maskar
रायगड जिल्ह्यातील तळा गावाजवळ तळागड किल्ला वसलेला आहे. हा १६ व्या शतकातील डोंगरावरील किल्ला आहे.
तळागड समुद्रसपाटीपासून १,००० फूट उंचीवर वसलेला किल्ला असून व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी आणि कुंडलिका नदीच्या परिसरावर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाचा होता. तसेच जंजिऱ्याच्या सिद्दींच्या सागरी हालचालींवरही लक्ष ठेवले.
तळागड किल्ला २० मीटर रुंदीच्या अरुंद खडकाळ भागावर बांधलेला आहे. या किल्ल्याची दुहेरी तटबंदी आणि बुरूज आजही चांगल्या स्थितीत आहेत.
तळागड किल्ला रोहा जवळ आहे. पहिल्यांदाच ट्रेकिंगचा प्लान करत असाल तर तळागड किल्ल्याला आवर्जून जा.
तळागड किल्ल्यावर जाण्यासाठी ट्रेकिंग तळा गावापासून सुरू होते. तळागड किल्ल्याला जाण्यासाठी माणगाव हे जवळचे स्टेशन आहे.
ऐतिहासिक नोंदींनुसार, तळागडकिल्ल्याची मुळे ११ व्या शतकातील शिलाहार राजवटीशी जोडलेली आहेत आणि १६ व्या शतकाच्या सुरुवातीला विजापूरच्या आदिलशाही राजवटीनेही याचा वापर केला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४८ मध्ये आदिलशाही राजवटीकडून तळागड किल्ला जिंकून घेतला. अरबी समुद्रापासून मावळ प्रदेशाच्या अंतर्गत भागाकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या किनारपट्टीवरील व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी या किल्ल्याचा मोक्याचा उपयोग केला.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.