Shreya Maskar
सासवड हे कर्हा नदीच्या काठावर वसलेले पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाण आहे. तुम्ही येथे वीकेंडला फॅमिली ट्रिप प्लान करू शकता.
मल्हारगड किल्ला हा सोनोरी किल्ला म्हणूनही ओळखला जातो, जो सासवडपासून फक्त 6-8 किमी अंतरावर आहे. मल्हारगड मराठा साम्राज्याने बांधलेला शेवटचा किल्ला आहे.
दौलतमंगळ किल्ल्याला 'मंगळगड' किंवा 'भुलेश्वर किल्ला' असेही म्हणतात. सासवडपासून अंदाजे 20 किमी अंतरावर हा किल्ला आहे. किल्ल्याच्या शिखरावर कोरलेले भुलेश्वर मंदिर देखील आहे.
पुरंदर किल्ला सासवडपासून सुमारे 10-12 किमी अंतरावर वसलेला आहे. हे छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान आहे. हा डोंगरावरील किल्ला आहे.
वज्रगड किल्ला पुरंदर किल्ल्यापासून फक्त 1.5 किमी अंतरावर आहे. पुरंदर किल्ला पाहायला गेल्यावर या किल्ल्याला देखील नक्की भेट द्या.
सासवडपासून 60 किमी अंतरावर राजगड किल्ला वसलेला आहे. येथे साहसी ट्रेकिंग अनुभव घेता येतो.
जाधवगड किल्ला सासवड शहरापासून फक्त 10-12 किमी अंतरावर आहे. जाधवगड किल्ला सध्या हेरिटेज हॉटेल मध्ये रूपांतरित झाला आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.