Shreya Maskar
पुणे जिल्ह्यात ऐतिहासिक राजमाची किल्ला वसलेला आहे. जो लोहगडाजवळ आहे. हा किल्ला पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांगेत आहे.
लोणावळा आणि कर्जत यांच्या दरम्यान सह्याद्रीच्या दुर्गम पर्वतरांगांमध्ये वसलेला राजमाची किल्ला हा १७ व्या शतकातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. यात 'श्रीवर्धन' आणि 'मनरंजन' असे दोन स्वतंत्र बालेकिल्ले आहेत, जे पायथ्याशी असलेल्या 'उधेवाडी' या गावावरून वरच्या दिशेला उभे असलेले दिसतात.
राजमाची किल्ला लोणावळ्याजवळील 'बोर घाट' व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने मोक्याच्या ठिकाणी होता. पावसाळ्यात येथे ट्रेकिंगचा प्लान करा.
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५७ मध्ये विजापूरच्या आदिलशाही राज्यकर्त्यांकडून राजमाची किल्ला जिंकून घेतला. त्यामुळे इतिहासात या ठिकाणाला मोठे महत्त्व आहे.
राजमाची किल्ला मूळतः सातवाहन राजवटीने इसवी सन पूर्व २३० ते इसवी सन पूर्व २०० या काळात बांधला होता. राजमाची किल्ला सुमारे २,७५० फूट उंचीवर आहे.
लोहगडजवळ विसापूर किल्ला आहे. विसापूर किल्ला १८व्या शतकातील मराठा किल्ला आहे. हा पावसाळी ट्रेकसाठी प्रसिद्ध आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.