Konkan Tourism : समुद्रकिनारे, धबधबे अन् तलाव, रिमझिम पावसात कोकणातील 'हे' ठिकाण दिसते लय भारी

Shreya Maskar

कोकण

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी हे एक निसर्गरम्य शहर आहे. सावंतवाडी शहर येथील १८ व्या शतकातील राजवाडा, मोती तलाव आणि पारंपारिक गंजिफा कला आणि लाखेच्या वस्तू यासाठी प्रसिद्ध आहे.

Konkan | pinterest

सावंतवाडी राजवाडा

१८ व्या शतकाच्या उत्तरार्धात 'खेम सावंत (तिसरे)' यांनी बांधलेला हा राजवाडा, इंग्रजी शैलीतील कमानी आणि स्थानिक लाल लॅटेराईट (जांभा) दगडांच्या बांधकामाचा एक सुंदर मिलाफ आहे.

Sawantwadi Palace | pinterest

संग्रहालय

सावंतवाडी राजवाड्यात एक संग्रहालय असून, तिथे राजघराण्याशी संबंधित ऐतिहासिक वस्तू जतन करण्यात आल्या आहेत. त्या पाहायला नक्की जा.

Museum | pinterest

मोती तलाव

शहराच्या अगदी मध्यभागी वसलेला मोती तलाव एक विशाल आणि सुंदर ठिकाण आहे. फेरफटका मारण्यासाठी, पिकनिकसाठी आणि निवांत बोटिंगसाठी हे एक अत्यंत नयनरम्य ठिकाण आहे.

Moti Lake | pinterest

आंबोली घाट

सावंतवाडीपासून अगदी जवळच आंबोली घाट वसलेला आहे. येथील धुक्याने आच्छादलेले निसर्ग,पावसाळ्यात ओसंडून वाहणारे धबधबे पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे.

Amboli Ghat | pinterest

सिंधुदुर्ग पिकनिक स्पॉट

तारकर्ली समुद्रकिनारा, सिंधुदुर्ग किल्ला, देवबाग समुद्रकिनारा,कुणकेश्वर मंदिर आणि कुणकेश्वर समुद्रकिनारा, रेडी किल्ला ही प्रमुख पर्यटन स्थळे आहेत.

Sindhudurg Picnic Spot | pinterest

पावसाळी ट्रिप

कोकणातील या सर्व ठिकाणी पावसाळ्यात नक्की जा. येथे थंड वातावरण अनुभवता येईल. तसेच तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात भन्नाट फोटोशूट करू शकता.

Rainy Trip | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | pinterest

NEXT : पावसाळ्यात मरीन ड्राईव्ह फिरून कंटाळलात? मग बेलापूरजवळील 'हा' समुद्रकिनारा एकदा पाहाच

Belapur Tourism | saam tv
येथे क्लिक करा...