Shreya Maskar
पावसाळ्यात वीकेंडला बाहेर फिरायला जाण्यापेक्षा मुंबईतच बेलापूर येथे एक सुंदर पिकनिक स्पॉट लपलेला आहे. ज्याचे नाव उरण बीच असे आहे.
बेलापूरजवळ शांत आणि निसर्गरम्य उरण बीच वसलेला आहे. उरण बीच हा पिरवाडी बीच म्हणूनही ओळखला जातो. पावसाळ्यात वीकेंड ट्रिपसाठी हे बेस्ट लोकेशन आहे.
उरण बीच हा नवी मुंबईजवळील रायगड जिल्ह्यातील एक शांत, स्वच्छ समुद्रकिनारा आहे. संध्याकाळी निवांत वेळ घालवण्यासाठी हे बेस्ट लोकेशन आहे.
लोकल ट्रेनने बेलापूर स्टेशनला पोहचा. तेथून उरणसाठी ट्रेन पकडा. उरण स्टेशनवरून बीचपर्यंत जाण्यासाठी शेअरिंग रिक्षाने प्रवास करा.
उरण समुद्रकिनाऱ्यावरून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. येथे मऊ वाळू, काही खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि अरबी समुद्राचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.
तुम्हाला प्री वेडिंग शूट करायचे असेल तर उरण बीचला नक्की भेट द्या. येथून सू्र्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
उरण बीचजवळ द्रोणागिरी किल्ला, माणकेश्वर बीच आणि मंदिर, रत्नेश्वरी मंदिर, विमला तलाव आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.