Shreya Maskar
तळेगाव दाभाडे येथे इंदुरी गावात इंदोरी किल्ला वसलेला आहे. इंदोरी किल्ल्याला 'इंदुरी किल्ला' असेही म्हणतात. हा भुईकोट (जमिनीवरील) किल्ला आहे.
इंदोरी किल्ला सरसेनापती सरदार खंडेराव दाभाडे यांनी १७२०-१७२१ मध्ये बांधला. हा किल्ला इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेला आहे.
इंदोरी किल्ल्याचा आकार साधारणपणे आयताकृती किंवा जमिनीवर पसरलेला असून, त्याच्या मागील बाजूचा भाग इंद्रायणी नदीच्या नैसर्गिक वळणाला लागून आहे.
इंदोरी किल्ल्याच्या संरक्षणासाठी एकूण ९ ते १० बुरूज आहेत, जे जाड दगडी भिंतींनी एकमेकांशी उत्तमरीत्या जोडलेले आहेत. संरक्षणात्मक भिंती ३० ते ४० फूट उंच आहेत. त्या मजबूत बेसाल्ट खडकापासून बांधल्या गेल्या असून त्यांच्या वरच्या भागात विटांचे काम केलेले आढळते.
पुण्यापासून ३५ किमी अंतरावर किल्ला आहे. मुंबईहून पुण्यापर्यंत ट्रेनने प्रवास करा. पुढे तळेगावपर्यंत रिक्षा किंवा एसटीने प्रवास करा.
इंदोरी किल्ल्याच्या आत 'कडजाई देवीचे मंदिर'आहे. येथे तुम्हाला शांत वातावरण अनुभवता येईल. हा किल्ला मराठा शैलीतील वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.
इंदोरी किल्ला दाभाडे कुटुंबाचे निवासस्थान आणि सत्तेचे मुख्य केंद्र होता. पावसाळ्यात तुम्ही येथे वीकेंडला फिरायला नक्की जा.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.