Shreya Maskar
नागपूर शहराच्या मध्यभागी, थेट नागपूर रेल्वे स्थानकाच्या समोर सीताबर्डी किल्ला वसलेला आहे. तुम्ही जर ट्रेकिंगचा पहिल्यांदा प्लान करत असाल तर सीताबर्डी किल्ला हे उत्तम लोकेशन आहे. किल्ल्यावरून शहराचे विहंगम दृश्य दिसते.
सीताबर्डी किल्ला 'माढा कॉलनी' परिसरातील 'मोठी टेकडी' आणि 'छोटी टेकडी' ('पूर्व टेकडी' आणि 'पश्चिम टेकडी') अशा दोन टेकड्यांवर वसलेला आहे.
सीताबर्डी किल्ला प्रामुख्याने १८१७ मधील ब्रिटिश आणि मराठा साम्राज्य यांच्यातील ऐतिहासिक 'सीताबर्डीच्या लढाई'चे ठिकाण म्हणून ओळखला जातो.
सीताबर्डी किल्ला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने बांधला होता. १८१७ मधील सीतावर्डीच्या लढाईनंतर याच्या बांधकामाला अधिकृतपणे सुरुवात झाली आणि १८२२ च्या सुमारास हा किल्ला पूर्ण झाला.
सीतावर्डी किल्ला लष्कराच्या नियंत्रणाखालील एक ऐतिहासिक ठिकाण आहे. किल्ल्याच्या बांधणीत बेसाल्ट खडक आणि खोल खंदकांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे.
मुंबईहून नागपूरपर्यंत ट्रेनने प्रवास करा. त्यानंतर नागपूर स्टेशनपासून रिक्षाने सीतावर्डी किल्ल्यापर्यंत पोहचा.
सीताबर्डी किल्ला सामान्यत तीन राष्ट्रीय सणांच्या दिवशीच लोकांसाठी खुला केला जातो. प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी), महाराष्ट्र दिन (१ मे) आणि स्वातंत्र्यदिन (१५ ऑगस्ट)
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.