Ahilyanagar: तलावात पोहताना भयंकर घडलं, पाण्यात बुडून MBA च्या ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू; अहिल्यानगरमध्ये खळबळ

3 MBA Students Die While Swimming: अहिल्यानगरमध्ये एमबीएच्या ३ विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
Ahilyanagar: तलावात पोहताना भयंकर घडलं, पाण्यात बुडून MBA च्या ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू; अहिल्यानगरमध्ये खळबळ
3 MBA Students Die While SwimmingSaam Tv
Published On
  • अहिल्यानगरमध्ये ३ एमबीएच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू

  • पोहताना पाण्याचा अंदान न आल्याने बुडून मृत्यू झाला

  • तलावात पोहण्यासाठी उतरल्यानंतर घडली घटना

  • लोणी पोलिसांचा तपास सुरू

सचिन बनसोडे, अहिल्यानगर

अहिल्यानगरमध्ये भयंकर घटना घडली. एमबीएच्या ३ विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला. अहिल्यानगर जिल्ह्यातील चंद्रपूर गावात ही घटना घडली. या घटनेमुळे अहिल्यानगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली असून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, साठवण तलावात बुडून ३ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अहिल्यानगर जिल्ह्यातील चंद्रपूर गावात ही घटना घडली. हे तिन्ही तरुण एमबीएचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. साठवण तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले. स्थानिक त्यांच्या मदतीसाठी धावले पण त्यांना तिघांना वाचवण्यात अपयश आले.

Ahilyanagar: तलावात पोहताना भयंकर घडलं, पाण्यात बुडून MBA च्या ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू; अहिल्यानगरमध्ये खळबळ
Shocking : घरात कोणीही नसताना सैतान जागा झाला, तोंड,हात बांधून भावाकडून बहिणीवर बलात्कार

२४ वर्षीय अभिषेक गंगाधर जाधव, २३ वर्षीय प्रवीण प्रभाकर रसाळ आणि २६ वर्षीय महेश अशोक शिंदे या तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेची माहिती मिळताच लोणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. लोणी पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.

Ahilyanagar: तलावात पोहताना भयंकर घडलं, पाण्यात बुडून MBA च्या ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू; अहिल्यानगरमध्ये खळबळ
Nashik: घरामध्ये लाईट बसवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून नवविवाहित तरुणाचा जागीच मृत्यू

दरम्यान, पुण्या जवळच्या पानशेत धरणाच्या कालव्यामध्ये बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आळी आहे. तन्मय संदीप शेठे (वय २२ वर्षे) असं या तरुणाचे नाव असून तो पुण्यातील नऱ्हे येथे राहणारा होता. तन्मय पानशेत धरणाच्या कालव्यात पोहण्यासाठी उतरला असताना अचानक खोल पाण्यात ओढला गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना समजताच वेल्हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचा मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

Ahilyanagar: तलावात पोहताना भयंकर घडलं, पाण्यात बुडून MBA च्या ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू; अहिल्यानगरमध्ये खळबळ
Shocking : सावत्र आई अन् मुलाच्या प्रेमसंबंधांचा भयंकर शेवट, प्रियकराच्या आत्महत्येनंतर प्रेयसीने घेतला टोकाचा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com