Police officials investigate the ₹400 crore container theft case as Nashik and Karnataka links come to light. saam tv
महाराष्ट्र

Crime News: तब्बल 400 कोटी रुपये असलेले दोन कंटेनर चोरीला; कर्नाटकातील चोरीचं नाशिक कनेक्शन काय?

400 Crore Containers Stolen in Karnataka: कर्नाटकात ४०० कोटी रुपये असलेले दोन कंटेनरची चोरी झालीय. या घटनेनंतर तपास यंत्रणा नाशिकला पोहोचल्या आहेत. अपहरणाच्या चौकशीदरम्यान हे प्रकरण समोर आले.

Bharat Jadhav

  • निवडणुकीच्या धामधुमीत ४०० कोटींचे दोन कंटेनर चोरीला

  • कर्नाटकातील चोरीचा नाशिक कनेक्शन उघड

  • राजकीय व बिल्डर लॉबीचा सहभाग असल्याचा आरोप

महापालिका निवडणुकांचा धुरळा असताना नाशिकमधून एक खळबळजनक प्रकरण समोर आलंय. निवडणुकीच्या धामधुमीत तब्बल ४०० कोटी रुपये असलेले कंटेनर चोरीला गेलेत. या प्रकरणात राजकीय आणि बिल्डर लॉबीचा समावेश असल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणात आत्तापर्यंत ७ संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत. ४०० कोटींच्या जुन्या नोटांचा कंटेनर कर्नाटक हद्दीत चोरीला गेलाय. दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे कर्नाटक पोलिसांनी देखील चौकशी केली आहे. तर कंटेनर चोरी प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिसांनी रात्री उशिरा डोंबिवलीमधून एका संशयिताला ताब्यात घेतलंय.

विशेष म्हणजे नाशिकमधील एका तरुणाच्या अपहरणाच्या तपासातून हा संपूर्ण प्रकार समोर आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये संदीप पाटील या तरुणाचं अपहरण झालं होतं. या प्रकरणी तपासा करताना कर्नाटकमधील चोरला घाटात १६ ऑक्टोबर रोजी कंटेनर लुटण्यात आले होते असा खुलासा संदीप पाटील याने केलाय. गोव्याहून कर्नाटकमार्गे एका ट्रस्टकडे जाणाऱ्या दोन कंटेनरमध्ये तब्बल ४०० कोटी रुपये होते. हे पैसे २००० रुपयांच्या जुन्या नोटांमध्ये होते. नाशिकमध्ये अपहरणाची तक्रार दाखल केल्यानंतर ४०० कोटींच्या जुन्या नोटांचा कंटेनर चोरीला गेल्याच उघडकीस आलंय.

संदीप पाटील याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत कंटेनर चोरीची माहिती दिलीय. “१६ ऑक्टोबर २०२५ रोजी कर्नाटकमधील चोरला घाटात दोन कंटेनरमध्ये ४०० कोटी रुपये होते. हे पैसे गोव्याहून कर्नाटकमार्गे एका ट्रस्टकडे जात होते. रात्रीच्या अंधारात हे कंटेनर लुटण्यात आलेत. या कंटेनरमधील २००० रुपयांच्या जुन्या नोटांचा मूळ मालक हा ठाण्यातील एक बिल्डर असल्याचं संदीप पाटीलने सांगितलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ये गारेगार....हार्बर रेल्वेवर १४ एसी लोकल; पनवेल ते मुंबई प्रवास सुखकर, जाणून घ्या वेळापत्रक

Ratnagiri Tourism : मन उधाण वार्‍याचे...; कोकणाच्या मातीत लपलाय 'हा' किनारा, पाहता क्षणी निसर्गाच्या प्रेमात पडाल

Zilla Parishad Election: राज्यात भाजपचा धमाका! ZP निवडणुकीआधीच उडवला विजयाचा बार, कोकणात १० जण बिनविरोध, विरोधकांना मोठा धक्का

Maharashtra Live News Update: चंद्रपूर मनपात सत्ता स्थापनेत एक नवा ट्विस्ट

Dog Attack: कुत्र्यांची टोळी अंगावर धावली तर काय कराल? दुचाकी चालकांनी ही माहिती वाचाच

SCROLL FOR NEXT