Lonavala Crime : लोणावळ्यात एकाच रात्री तीन घरफोड्या; साहित्याची तोडफोड करत लांबविला ऐवज

Maval Lonavala News : तिन्ही घटनांमध्ये तीन अज्ञात चोरट्यांचा सहभाग असल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे. लोणावळा शहर पोलीस ठाण्यात याबाबत अज्ञात आणि विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे
Lonavala Crime
Lonavala CrimeSaam tv
Published On

मावळ : पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात एकाच रात्रीत तीन चोरीच्या घटना पुढे आल्या आहेत. या चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री पोलिसांची असलेली गस्त कमी झाल्याने चोरट्यांनी संधी साधली असून घरात साहित्याची तोडफोड करत ऐवज लांबविला असून पोलीस तपास सुरु करण्यात आला आहे. 

लोणावळा येथे काल रात्रीच्या सुमारास या चोरीच्या घटना घडल्या आहेत. यात लोणावळ्यातील साधना रेसिडेन्सी बिल्डिंग मधील राजू खांडभोर यांचे घर बंद होते. अज्ञात चोरटयांनी बंद फ्लॅटमध्ये दरवाजाचे लॉक तोडून तीस हजार रुपयांचा रोकड आणि दीड तोळे सोने चोरून पसार झाले आहे. तसेच चोरट्यांनी घरातील इतर साहित्यांनी तोडफोड केली आहे. कुटुंबीय घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 

Lonavala Crime
Maval : मित्रांसोबत पोहायला गेला असता तरुण नदीत बुडाला; देहुरोड येथील दुर्दैवी घटना

एकाच सोसायटीत दोन घरात चोरी 

तर याच परिसरात असलेल्या दत्त सोसायटीमधील श्रीमती होळकर आणि अनघा कुलकर्णी यांच्या बंगल्यामध्येही चोरी झाल्याची माहिती मिळत आहे. तर भालेकर यांच्या घरात चोरीचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. या तिन्ही घटनांमध्ये तीन अज्ञात चोरट्यांचा सहभाग असल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे. लोणावळा शहर पोलीस ठाण्यात याबाबत अज्ञात आणि विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Lonavala Crime
Gulabrao Patil : ज्याला शिवी ऐकता येते त्याने आमदार व्हावं, महायुतीचे आमदार असं का म्हणाले?

पोलीस गस्त कमी झाल्याने वाढल्या चोरी 

तर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. स्थानिक नागरिकांच्या मते अलीकडे शहरातील रात्रीची पोलीस ग्रस्त कमी झाल्याने अशा प्रकारच्या घटना वाढत आहेत. काही काळापूर्वी शहर पोलिसांकडून रात्रभर गस्त घातली जात होती. तसेच सोसायट्यांमधील सुरक्षारक्षकांची ही समन्वयक साधून संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवले जात होते. मात्र सध्या ही गस्त कमी झाल्याचे चोरट्यांनी फावले आहे. त्यामुळे लोणावळा शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com