Beed Crime: प्रवाशांनो सावधान! बीड ते तुळजापूर दरम्यान १० धोकादायक ठिकाणे, महामार्गावर होतेय जबरी चोरी अन् लुटमार

Dhule-Solapur highway High-Risk Zones: बीड-तुळजापूर महामार्गावरील दरोडे, लूट आणि दरोड्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यानंतर पोलिसांनी प्रवाशांसाठी सावधनतेचा इशारा जारी केलाय. मांजरसुंभ घाटासह दहा ठिकाणे अतिधोकादायक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
Dhule-Solapur highway High-Risk Zones:
Police conducting highway safety checks on the Beed–Tuljapur route after multiple robbery incidents.saam tv
Published On
Summary
  • बीड ते तुळजापूर महामार्गावर १० ठिकाणे धोकादायक

  • मांजरसुंबा घाट प्रवाशांसाठी सर्वाधिक संवेदनशील.

  • मदतीसाठी सोशल मीडियावर संपर्क क्रमांक जाहीर.

योगेश काशिद, साम प्रतिनिधी

बीड आणि धाराशिव पोलिसांसह महामार्ग सुरक्षा पथकाकडून धुळे-सोलापूर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. बीड ते तुळजापूर दरम्यान होत असलेल्या जबरी चोरी, लुटमार, दरोड्याच्या घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी मांजरसुंबा घाटासह दहा ठिकाणं धोकादायक असल्याचे जाहीर करत प्रवाशांना सावधानतेचा इशारा दिला आहे. (10 Dangerous Spots Identified On Beed–tuljapur Highway After Robbery Cases)

हॉटेल चालक, महामार्ग लगतच्या गावातील ग्राम सुरक्षा दल, सरपंच, पोलीस पाटील अशा सर्व घटकांना ॲक्टिव्ह करण्यात आले असुन अशा घटना रोखण्यासाठी, अशा घटनांचे शिकार झालेल्या लोकांना तात्काळ मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीसाठीचे संपर्क क्रमांक जारी करण्यात आले आहेत. तर 7 वाहनं देखील तैनात करण्यात आले आहेत.

Dhule-Solapur highway High-Risk Zones:
AhilyaNagar Crime: डान्सर दिपाली पाटील विवाहित, दोन मुलांची आई; कला केंद्रातील नृत्यांगना आत्महत्या प्रकरणी नवी अपडेट

पोलीस प्रशासनाकडून सोशल मीडियावर सावधानतेचा इशारा देणारा संदेश जारी करण्यात आलाय.

राष्ट्रीय महामार्ग ५२ (बीड ते तुळजापूर) प्रवाशांसाठी सतर्कतेचा इशारा -

बीड ते तुळजापूर दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी बीड पोलीस आणि महामार्ग सुरक्षा पथकाकडून अत्यंत महत्त्वाचे आवाहन करण्यात येत आहे. खालील धोकादायक ठिकाणी चोरी, लुटमार आणि दरोड्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

धोकादायक ठिकाणे

या १० ठिकाणी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे:

१. मांजरसुंबा घाट (बीड)

२. चौसाळा बायपास

३. पारगाव बायपास

४. सरमकुंडी फाटा

५. इंदापूर फाटा

६. पार्डी फाटा

७. घुले माळ जवळील उड्डाणपूल

८. तेरखेडा ते येडशी टोल नाका

९. येडशी बायपास

१०. धाराशिव ते तुळजापूर

Dhule-Solapur highway High-Risk Zones:
Kolhapur Crime: कॅफेच्या आड चालायचा भलताच प्रकार! कॅफेत स्पेशल रुम अन् सापडली कंडोमची पाकीटं

महामार्गावर अशी होते लुटमार

कृत्रिम अपघात :महामार्गावर धावत्या वाहनांसमोर अचानक जॅक (Jack) किंवा खिळे असलेले लाकडी ओंडके टाकून अपघात घडवणे व मदत करण्याच्या बहाण्याने लुटणे.

शस्त्रांचा धाक: वाहन अडवून शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी करणे.

दुचाकीस्वारांना लक्ष करणे: धावत्या दुचाकीला धक्का देणे किंवा मागे बसलेल्या प्रवाशाला ओढून खाली पाडणे. तसेच पाठलाग करून 'चैन स्नॅचिंग' करणे.

कृत्रिम गतीरोधक तयार करुन

ठिबकचे पाईप बंडल वापरून गतिरोधक असल्याचे भासवून वाहन थांबायला भाग पाडणे आणि त्यानंतर दबा धरून बसलेल्या साथीदारांमार्फत सामुदायिक हल्ला करणे.

Dhule-Solapur highway High-Risk Zones:
Beed Crime: बीडमधील गुंडाराजला पोलिसांची साथ? गावगुंडांकडून ग्रामरोजगार सेवकाला जबर मारहाण; दोन्ही पाय मोडले, दुचाकीला बांधून ओढलं

इंधन चोरी : रात्रीच्या वेळी हॉटेल किंवा पेट्रोल पंपावर थांबलेल्या मालवाहतूक वाहनांच्या टाकीतून डिझेल चोरी करणे.

दुभाजकाचा (Divider) वापर: दुभाजकामध्ये असलेल्या झाडा झुडपात लपून बसणे आणि वाहनावर हल्ला करणे.

नागरिकांसाठी सुरक्षिततेच्या सूचना

थांबू नका: वर नमूद केलेल्या १० धोकादायक ठिकाणी आणि निर्मनुष्य रस्त्यावर गाडी थांबवणे टाळा.

समूहाने प्रवास करा: रात्रीच्या वेळी प्रवास करताना एकटे जाणे टाळा. शक्यतो अनेक वाहनांच्या समूहाने (Convoy) प्रवास करा.

दुभाजकापासून अंतर ठेवा: वाहन चालवताना दुभाजकाला (Divider) एकदम खेटून चालवू नका, कारण चोरटे झुडपात लपलेले असू शकतात.

संशयास्पद हालचाली: रस्त्यात लाकूड, दगड किंवा संशयास्पद वस्तू दिसल्यास गाडी थांबवू नका, वेगात पुढे निघून जा.

मदत कोठे मागाल?: काहीही संशयास्पद वाटल्यास त्वरित जवळचे हॉटेल, पेट्रोल पंप किंवा धाबा यासारख्या लोकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी आश्रय घ्या.

पोलीस मदत आणि संपर्क क्रमांक:

पोलिस प्रशासनाने सुरक्षेसाठी गस्ती पथके (७ वाहने) तैनात केली आहेत. आपत्कालीन परिस्थितीत खालील क्रमांकावर संपर्क साधावा:

डायल ११२ (Dial 112) - तात्काळ मदतीसाठी

पोलीस निरीक्षक शंकर शिंदे (पो. ठाणे वाशी): 93551 00100

सपोनि (API) गोसावी (पो. ठाणे नेकनूर): 90090 08070

सपोनि (API) भालेराव (पो. ठाणे येरमाळा)

सपोनि बाळराजे दराडे (बीड ग्रामीण) 7720050100

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com