

जामखेड येथील साई लॉजमध्ये दिपालीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दिपाली पाटील कला केंद्रात नृत्यांगना म्हणून काम करत होती.
दिपाली पाटील विवाहित होती शिवाय ती दोन मुलांची आई होती.
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील साई लॉजमध्ये एका नृत्यांगनाने गळफास घेत आत्महत्या केली होती. आता या आत्महत्या प्रकरणी नवी अपडेट समोर आलीय. दिपाली पाटील, असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. ती कला केंद्रात नृत्यांगना म्हणून काम करत होती. जामखेडमधील तपनेश्वर भागात ती राहत होती. दिपालीच्या आत्महत्यावरून राजकारण तापलं होतं. भाजपशी निगडीत असलेल्या संदीप गायकवाड याने दिपाली मागे लग्नाचा तगादा लावला होता त्यामुळे दिपालीने आत्महत्या केली होती, असा आरोप दिपालीची आई दुर्गा गायकवाड यांनी केला होता.
आता या आत्महत्या प्रकरणात नवी अपडेट समोर आलीय. दिपाली पाटील हिने तीन महिन्यापूर्वीच कला केंद्र सोडले होते, अशी माहिती संबंधित कला केंद्राचे मालक अरविंद जाधव यांनी दिलीय. दरम्यान याप्रकरणात संदीप गायकवाड यांच्या विरोधात गु्न्हा दाखल करण्यात आलीय. त्यांच्या पत्नीने लता गायकवाड यांनी नुकतेच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत भाजपकडून प्रभाग 5 ब मधून नगरसेवकपदाची निवडणूक लढवलीय. त्यामुळे राजकीय वर्तुळात या घटनेची मोठी चर्चा होतेय.
दिपाली पाटील ही मुळची कल्याण येथील रहिवाशी होती. तिचा विवाह झाला असून तिला दोन मुलं आहेत. नवऱ्यासोबत तिचे मतभेद झाल्याने ती स्वतंत्र राहू लागली. तिचे दोन्ही मुलं हे कल्याण येथे आजीसोबत राहत आहेत. घरातील आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिने कला केंद्रात काम करणं सुरू केलं.
दिपाली काही दिवसांपासून संदीप गायकवाडच्या संपर्कात होती. संदीप गायकवाड हा तिला लग्नासाठी दबाव टाकत होता. दरम्यान दोन दिवसांपूर्वी ती बाजारात गेली होती. पण परत कला केंद्रात न आल्याने मैत्रिणींनी शोधाशोध सुरू केली. दिपाली ज्या रिक्षाने गेली त्या चालकाकडून चौकशी केली. तेव्हा त्याने तिला साई लॉज येथे सोडल्याचे सांगितले.
मैत्रिणी सायंकाळी लॉजमध्ये पोहोचल्या. तेथे तपास केल्यानंतर दिपाली पाटील तेथे असल्याची माहिती मिळाली. त्या तिच्या रुमकडे गेल्या. तेव्हा लॉक होती. लॉज कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला. तेव्हा दिपालीने पंख्याला गळफास घेतल्याचे आढळून आले. दिपाली ज्यावेळेला लॉजवर गेली होती त्या वेळेला संदीप देखील त्या ठिकाणी आला होता हे सीसीटीव्हीतून दिसून आलंय. दरम्यान पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.