AhilyaNagar Crime: लग्नासाठी सततचा त्रास,लॉजमध्ये नृत्यांगनाने घेतला गळफास; भाजपच्या माजी नगरसेवकाला ठोकल्या बेड्या

Jamkhed Dancer Killed Herself : लग्नासाठी सतत छळ होत असल्याने जामखेड येथील लॉजमध्ये ३५ वर्षीय नृत्यांगनाने आत्महत्या केलीय. दीपाली पाटील असं आत्मतहत्या करणाऱ्या नृत्यांगनाचे नाव आहे. तिच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर माजी नगरसेवक संदीप गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Police outside Sai Lodge in Jamkhed where dancer Deepali Patil was found hanging; former corporator Sandeep Gaikwad arrested in the case.
Police outside Sai Lodge in Jamkhed where dancer Deepali Patil was found hanging; former corporator Sandeep Gaikwad arrested in the case.
Published On
Summary
  • साई लॉजमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने गळफास घेत आत्महत्या केलीय.

  • सतत लग्नाची मागणी करत तिला त्रास दिला जात असल्याची तक्रार दाखल करण्यात आलीय.

  • पोलिसांनी आरोपीला अटक केली असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

सुशील थोरात, साम प्रतिनिधी

जामखेड शहरातील तपनेश्वर भागात राहणारी व स्थानिक कलाकेंद्रात नृत्यांगना म्हणून काम करणारी दिपाली गोकुळ पाटील (वय ३५) हिने खर्डा रोडवरील साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (४ डिसें.) उघडकीस आली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

Police outside Sai Lodge in Jamkhed where dancer Deepali Patil was found hanging; former corporator Sandeep Gaikwad arrested in the case.
Pune : घायवळ प्रकरणात जामखेड कनेक्शन, भाजप आमदाराचा गंभीर आरोप, वाचा नेमकं काय म्हणाले

मुलीची आई दुर्गाबाई (कल्याण) गायकवाड यांनी जामखेड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करत संदीप सुरेश गायकवाड याने माझ्या मुलीला सतत लग्नाची मागणी करत होता याच त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केली असावी असे तक्रारीत म्हटले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केले कलम 108 भादवी प्रमाणे जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 648 / 2025 BNS108 प्रमाणे दाखल तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे करत आहेत. आरोपी भाजपचे माजी नगरसेवक संदीप गायकवाड यास जामखेड पोलीसांनी अटक केली आहे.

Police outside Sai Lodge in Jamkhed where dancer Deepali Patil was found hanging; former corporator Sandeep Gaikwad arrested in the case.
Pune Land Scam Case: पुणे पोलिसांकडून शितल तेजवानीच्या घराची झाडाझडती; महत्त्वाचे कागदपत्रे जप्त, कालाचिठ्ठा येणार बाहेर

घटना कशी उघडकीस आली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळची कल्याण (ठाणे) येथील दिपाली पाटील जामखेडमध्ये नृत्यांगना म्हणून कार्यरत होती आणि काही मैत्रिणीं सोबत तपनेश्वर भागात राहत होती. गुरुवारी सकाळी मी बाजारात जाऊन येते असे सांगून ती बाहेर पडली. परंतु अनेक तास उलटूनही ती परत न आल्याने मैत्रिणींनी शोधाशोध सुरू केली. दिपाली ज्या रिक्शाने गेली त्या चालकाकडून चौकशी केली असता, त्याने तिला साई लॉज येथे सोडल्याचे सांगितले.

मैत्रिणी सायंकाळी लॉजमध्ये पोहोचल्या असता रूम आतून लॉक होती. लॉज कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता, दिपालीने पंख्याला गळफास घेतल्याचे आढळले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात हलवला.

या प्रकरणी दिपालीची मैत्रीण हर्षदा रविंद्र कामठे हिने दिलेल्या खबरीवरून जामखेड पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून जामखेडमधील अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

त्यांनी म्हटले आहे की: दिपाली पाटील आत्महत्या करण्यापूर्वी तिच्यासोबत कोण होते?त्या व्यक्तीचे संबंध कोणाशी आहेत?त्याला कोणत्या उच्चपदस्थांचा पाठिंबा आहे? त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली?याचे तपशील पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन शोधावे, अशी त्यांनी मागणी केली आहे. तसेच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही ते कधीही यशस्वी होऊ देणार नाही,असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com