satara, covid-19, coronavirus saam tv
महाराष्ट्र

Satara : फलटणसह साता-यात काेविड बाधितांची संख्या वाढू लागली; मास्क वापरा धाेका टाळा

सातारा जिल्ह्यात दरराेज बाधितांच्या संपर्कात असलेल्या संशयितांची देखील तपासणी करण्यात येत आहे.

Siddharth Latkar

सातारा : सातारा (satara) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा आरोग्य विभाग (health Department) सतर्क झाला आहे. गेल्या काही दिवसांत सातारा जिल्ह्यात काेविड (covid 19) बाधितांची संख्या 190 पर्यंत पाेहचली आहे. गत चाेवीस तासांत 68 नागरिकांना काेराेनाची बाधा झाल्याची माहिती आराेग्य विभागाने दिली. (satara latest marathi news)

गेल्या काही महिन्यांपासून सातारा जिल्ह्यात काेविड बांधितांची संख्या शून्य हाेती. दरम्यान या 15 ते 20 दिवसांत बाधितांची संख्या वाढू लागली आहे. दररोज तीन ते पाच बाधित आढळत आहेत. दरराेज तपासण्या देखील माेठ्या संख्येने करण्यात येत आहे.

गत चार दिवसांत काेविड बाधितांची संख्या दरराेज 23 ते 25 पर्यंत पाेहचत होती. आज ही संख्या 68 पर्यंत पाेहचली आहे. एका दिवसांत 68 रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात पुन्हा काेराेनाचा संसर्ग वाढताेय हे दिसून येत आहे.

जिल्हा आराेग्य विभागाने दिलेल्या माहितीनूसार गत चाेवीस तासांत 68 नागरिकांना काेविड 19 ची बाधा झालेली आहे. यामध्ये फलटण 24 रुग्ण, सातारा 14, काेरेगाव 7, खंडाळा व खटाव 5, वाई 2 माण, महाबळेश्वर, पाटण 1, अन्य 5 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान नागरिकांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Siddharth Chandekar: सिद्धार्थ चांदेकरला महानगर गॅसच्या नावाने आला फ्रॉड कॉल; अभिनेत्याने कॉलरला म्हणायला लावली मराठी कविता

White Hair Remedy: कॉफी किंवा कोको पावडरने पांढरे केस होतील गायब, आत्ताच वाचा ट्रिक

Indian Navy Recruitment: १२वी पास तरुणांसाठी खुशखबर; भारतीय नौदलात नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

१५ मार्चपासून कॅटरिंग ऑर्डर बंद, गॅस सिलेंडरच्या तुडवड्यामुळे मोठा निर्णय

Maharashtra Live News Update: जळगावात जिल्ह्यात यलो अलर्ट, जळगावात उष्णतेची लाट

SCROLL FOR NEXT