चीन : ओमिक्रॉनमुळे (Omicron) काेविडच्या (COVID-19) रुग्ण संख्येत माेठ्या प्रमाणात वाढ हाेऊ शकते याचा अंदाज आल्याने चीनमधील (china) शीआन (Xi’an) शहरात पुढील आठ दिवस कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. परिणामी आज (बुधवार) मध्यरात्रीपासून या शहरातील दुकाने, शाळा, हाॅटेल तसेच गर्दी हाेणारी ठिकाणे एका आठवड्यासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. (china covid-19 latest marathi news)
गेल्या वर्षी शीआन महिनाभर लॉकडाउनच्या छायेत हाेते. शहरात शनिवारपासून एका भागात18 पेक्षा जादा रुग्ण संख्य आढळली आहे. हे रुग्ण ओमिक्रॉनच्या संक्रमणामुळे वाढले आहेत ज्यामुळे अमेरिका आणि ब्रिटनला देखील फटका बसला हाेता.
झांग झुएडोंग (Zhang Xuedong) यांनी पत्रकार परिषदेत घेत शीआन शहरात सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. काेराेना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी हा उपाय करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे ओमिक्रॉनचे संक्रमण थाेपविण्यास मदत हाेईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
आज (बुधवार) मध्यरात्रीपासून येथे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सरकारच्या सूचनेनुसार पब, इंटरनेट कॅफे आणि कराओके बारसह सार्वजनिक मनोरंजन स्थळे देखील बंद राहतील. हाॅटेल व्यावसायिकांनी केवळ पार्सल सुविधा द्यावी, शाळा आणि महाविद्यालयांनी देखील विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.