Shikhar Dhawan : वेस्ट इंडिज दौऱ्यात शिखर धवन करणार टीम इंडियाचं नेतृत्व; दिग्गज खेळाडूंना विश्रांती

सध्या भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे.
shikhar dhawan, indian team, west indies.
shikhar dhawan, indian team, west indies.saam tv

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्धच्या (indvswi) तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआयने आज (बुधवार) भारतीय संघाची (indian cricket team) घाेषणा केली. अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने शिखर धवन (shikhar dhawan) याची कर्णधारपदी नियुक्त केली आहे. या समितीने राेहित शर्मा (rohit sharma), विराट काेहली, रिषभ पंत, हार्दिक पांड्या यांना विश्रांती दिली आहे. (Indian cricket team latest marathi news)

क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद येथे भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. येत्या 22 जुलैपासून ही मालिका सुरू होईल. पहिला सामना 22 जूलैस, दुसरा 24 जूलैला आणि तिसरा 27 जुलैला हाेईल.

shikhar dhawan, indian team, west indies.
ओमिक्रॉनची सरकारनं घेतली धास्ती; दुकानं, शाळा, हाॅटेल आठवडाभर राहणार बंद

बीसीसीआयने जाहीर केलेल्या भारतीय संघात शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसीध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग यांचा समावेश आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com