सातारा : सातारा (satara) जिल्ह्यच्या पश्चिम भागात पावसाने (rain) चांगलाच जोर धरला आहे. मंगळवारपासून (ता. 5 जूलै) सतत पडणाऱ्या पावसाने निसर्गाने समृध्द असणारे पर्यटन स्थळ तापोळा (tapola) येथे तीन नद्यांचा संगम आहे. कोयना, सोळशी, कांदाटी या तिन्ही नद्या या ठिकाणी मिळतात. या भागात पावसाचा जोर वाढल्यामुळे (satara rain updates) दरे, गाढवली आणि इतर गावातील लोकांना आता जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. (Eknath Shinde latest Marathi News)
कोयना धरण क्षेत्रात सुद्धा पावसाने जोर धरल्याने या भागातील कोयना धरणाच्या बॅक वॉटरमध्ये सध्या पाणी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी पूलावर पाणी साचल्याने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
एका छोट्या होडीच्या साहाय्याने ग्रामस्थ या तिरावरून त्या तीरावर जात आहेत. गाढवली गावचे सुरेश माने केवळ यांची एक छोटी होडी सध्या या भागातील लोकांची ने आण करण्यासाठी सुरू आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे दरे हे मूळ गाव आसून ते बऱ्याच वेळा गावी येत असतात. (Marathi News Update)
मुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाल्यानंतर ते ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी गावी येणार होते. पण सध्याची पावसाची परिस्थिती पाहता त्यांचा दौरा देखील पुढे ढकलण्यात आला आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज (बुधवार) दुपारी अडीच वाजता ठाणे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेणार आहेत. साडे तीन वाजता आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पंढरपूर येथील वारकऱ्यांच्या सोयी सुविधांबाबत देखील अधिका-यांची बैठक घेणार आहेत असे मुख्यमंत्री कार्यालयातून कळविण्यात आले आहे. (Latest Marathi News)
साम टीव्हीच्या वृत्ताची घेतली प्रशासनाने दखल
दरम्यान प्रतापगड किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्री उशिरा दरड कोसळल्याचे वृत्त साम टीव्हीने आज (बुधवार) सकाळी दाखवल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. हे वृत्त प्रसारित हाेताच अवघ्या अर्धा तासांत या रस्त्यावरील दरड हटवण्याचे काम जेसीबी पाठवून प्रशासनाने सुरु केले. हा रस्ता खुला करण्याचे काम आता युद्ध पातळीवर सुरू आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.