१५ मार्चपासून कॅटरिंग ऑर्डर बंद, गॅस सिलेंडरच्या तुडवड्यामुळे मोठा निर्णय

Nagpur Caterers : नागपूरमध्ये एलपीजी सिलेंडरच्या तुटवड्यामुळे कॅटरिंग व्यवसायिकांनी मोठा निर्णय घेतला आहे. १५ मार्च २०२६ पासून नवीन कॅटरिंग ऑर्डर घेणे बंद करण्याची घोषणा करण्यात आली असून लग्न व इतर कार्यक्रमांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

LPG Cylinder Supply Crisis : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता हॉटेल व्यवसायिकांसोबत कॅटर्स व्यवसायिकांनाही बसायला सुरुवात झालेली आहे. रोज हजारो लोकांचे जेवण बनवत असताना आता सध्या तात्पुरती सिलेंडर व्यवस्था आहे. मात्र सिलेंडर संपल्यावर नंतर काय करावा असा प्रश्न आता कॅटर्स व्यवसायिकांना पडला आहे. १५ मार्च २०२६ पासून कॅटरिंगचे ऑर्डर घेणे बंद करण्याचा निर्णय नागपूरमधील कॅटरिंग व्यवसायिकांनी घेतला आहे.

सिलेंडर टंचाईमुळे समारंभ, सोहळे यांच्या कॅटरिंग ऑर्डर कसे घेणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. गॅस एजन्सी धारकांना फोन केला तर एकही सिलेंडर मिळणार नाही, असे सांगितले जात आहे, त्यामुळे आम्ही नेमकं काय करावा स प्रश्न पडल्याचे व्यावसायिक बोलत आहे. लग्नसराई सारख्या कार्यक्रमांमध्ये हजारो लोकांचे जेवण बनवताना जुन्या पद्धतीने चुलीवर जेवण इतक्या गतीने जेवण तयार होऊ शकत नाही. त्यामुळे मोठी समस्याच निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com