Election News: सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा ब्रेक! विधानसभेचा परिणाम; ३१ डिसेंबरपर्यंत स्थगिती  Saam Tv
महाराष्ट्र

Election News: सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा ब्रेक! विधानसभेचा परिणाम; ३१ डिसेंबरपर्यंत स्थगिती

Maharashtra Election News: राज्यात जाहीर करण्यात आलेल्या सहकार क्षेत्रातील निवडणुकांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यभरातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Gangappa Pujari

मुंबई, ता. ८ ऑक्टोबर

राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता पुढील आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. या विधानसभा निवडणुकांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर परिणाम झाला आहे. कारण राज्यात जाहीर करण्यात आलेल्या सहकार क्षेत्रातील निवडणुकांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यभरातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यातील 29 हजार ४४३ सहकारी संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान या निवडणुका होतील असं जाहीर करण्यात आले होते. मात्र आता या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पुढील महिन्यात विधानसभा निवडणुका होईल म्हणून सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.

याआधी जून महिन्यात ही निवडणूक पावसामुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता विधानसभा निवडणुकांचे कारण देत ही निवडणूक ३१ डिसेंबर २०२४ पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यातील दूध संघ, बाजार समिती, जिल्हा बँक व पतसंस्थांच्या अशा मिळून 29 हजार ४४३ सहकारी संस्थांच्या निवडणूकांचा यामध्ये समावेश होता.

दरम्यान, 2024-25 या वर्षातील 29,429 सहकारी संस्थांच्या निवडणूका प्रलंबित आहेत. त्यापैकी 7,109 सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. जून 2024 मध्ये राज्यातील पावसाची परिस्थिती विचारात घेऊन शासनाने 20 जून 2024 रोजीच्या आदेशान्वये राज्यातील सहकार संस्थांची निवडणूक प्रक्रिया 30 सप्टेंबर 2024 पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकांनंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा गुलाल उधळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

SCROLL FOR NEXT