मुंबई : भाजपला सोडचिठ्ठी दिलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांनी गौप्यस्फोट केला. पक्ष बदलताच हर्षवर्धन पाटलांनी लोकसभेत सुप्रिया सुळेंच्या विजयात त्यांचा कसा अदृश्य सहभाग होता, याचा गौप्यस्फोट केला. त्यामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांनीही बारामती लोकसभेच्या विजयाचं गुपित सर्वांसमोरच उघड केलं.
लोकसभा निवडणुकीवेळी हर्षवर्धन पाटील भाजपात होते. त्यांचा इंदापूर मतदारसंघ हा बारामती लोकसभेचा भाग आहे. लोकसभेला बारामतीमधून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार महायुतीच्या उमेदवार होत्या. मात्र, अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात 36 चा आकडा असल्यानं ते लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना कितपत मदत करतील, याबाबत साशंकता होती. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजकीय शिष्टाई करत अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात समेट घडवून आणला होता. केवळ हर्षवर्धन पाटलांचा हा दावाचं नाही तर आकडेही तेच दर्शवतात.
विधानसभा मतदारसंघ - सुप्रिया सुळे - सुनेत्रा पवार - लीड
दौंड - 92,064 - 65,727 - 26,337
इंदापूर - 1,14,020 - 88,069 - 25,951
बारामती - 1,43,941 - 96,560 - 47,381
पुरंदर - 1,25,948 - 90,667 - 35,281
भोर - 1,34,245 - 90,440 - 43,805
खडकवासला - 1,21,182 - 1,41,928 - 20,746
एकूण 1लाख 58 हजार 009 मतांच्या लीडसह सुप्रिया सुळेंनी लोकसभा निवडणुकीत बाजी मारली होती. यात हर्षवर्धन पाटलांच्या इंदापूरचाही सहभाग उल्लेखनीय आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत मावळसह बारामती तालुक्याचं राजकारण बदलताना पाहायला मिळणार एवढं नक्की.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.