Amruta Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Anjali Bharati: प्रसिद्ध गायिकेचे अमृता फडणवीसांबाबत आक्षेपार्ह विधान, बलात्कारावर बोलताना नको ते बरळली; पाहा VIDEO

Anjali Bharati On Amruta Fadnavis: गायिका अंजली भारतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले. बलात्कारावर बोलताना ती नको ते बरळली. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

Summary -

  • गायिका अंजली भारतीचे मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत वादग्रस्त विधान

  • महिलांवरील बलात्काराच्या मुद्द्यावर बोलताना नको ते बरळली

  • अमृता फडणवीस यांच्याविषयी केलेल्या विधानावर भाजपसह विविध पक्षांनी निषेध केला

  • सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली

गायिका अंजली भारतीने वादग्रस्त विधान केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत तिने अतिशय खालच्या दर्जाची भाषा वापरली आहे. त्यामुळे भाजप पक्ष आक्रमक झाला असून राजकीय वातावरण तापले आहे. राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचार आणि बलात्कारांच्या घटनांवर बोलताना अंजली भारतीने हे वादग्रस्त विधान केले आहे. सध्या सोशल मीडियावरून तिच्यावर टीकेची झोड सुरू झाली आहे. तिच्या विधानाचा राजकीय नेते निषेध करत आहेत.

भंडाऱ्यामध्ये १३ जानेवारीला भीम मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला गायिका अंजली भारतीने हजेरी लावली. यावेळी महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटना आणि आरोपींवर न होणाऱ्या कारवाईवर राग व्यक्त करत तिने थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांबद्दल नको ते विधान केले. आपल्या भाषणात अंजली तिने अमृता फडणवीस यांच्याबाबत बेजबाबदार विधान केले. त्याची आता सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

अंजली भारती म्हणाली, 'फाशी द्या फाशी द्या असे बोलतात. पण कसं सरकार फाशी देईल. मी बलात्कार करणाऱ्याला सांगते की कोणत्या पोरी आणि माय-बहिणीवर बलात्कार करण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या @#$###@. यांना काय माहिती मायबहिणीवर बलात्कार झाल्यावर दु:ख काय होते.' तसंच, 'जो बलात्कार करतो त्याचं डोकं, मान कापा. जो कुणी बलात्काऱ्याचे डोकं, मान कापून आणेल त्याला माझी अर्धी संपत्ती देईन आणि ५० लाख रुपये देईल.' असं वक्तव्य अंजली भारतीने केले.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवर पोस्ट करत लिहिले की, 'गायिका अंजली भारती यांनी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांसंदर्भात केलेलं वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व हीन दर्जाचं आहे. राज्यात महिला सुरक्षा- महिला सबलीकरण महत्त्वाचे आहेच, शक्ती कायद्याची गरज आहेच यात शंका नाही, पण महिला सुरक्षेवर बोलताना थेट दुसऱ्या एका महिलेसंदर्भात बलात्काराची भाषा वापरणं नक्कीच माणूस म्हणून देखील शोभणारं नाही. त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध!'

भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या की, 'श्रद्धेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसमोर उभं राहून मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर बलात्कार करण्याची चिथावणी, त्यावर टाळ्या-पैसे? हे समाजाच्या अधःपतनाचं भयावह चित्र आहे. पण आपल्याकडे श्रध्येय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधानाचं शस्त्र आहे. कायदेशीर प्रहार कसा करायचा ते आम्हाला माहितीये.'

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेटणेकर यांनी देखील ट्विटरवर पोस्ट करत संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, 'सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या पत्नी अमृता फडणवीसजी यांच्याबद्दल अतिशय गलिच्छ भाषेत गायिका अंजली भारती यांनी जे वक्तव्य केले त्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महिला आघाडीकडून निषेध करते.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update :मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवस सुटीवर

लिव्ह-इन रिलेशनशिपमधील जोडप्यांना नवरा-बायको समजलं जाणार? जनगणनेच्या नव्या नियमामुळे चर्चांना उधाण

Heart attack: हार्ट अटॅकपूर्वी दिसणाऱ्या या ५ लक्षणांकडे महिला करतात हमखास दुर्लक्ष; शरीरात होणारे बदल ओळखा

Gold Rate Today: खुशखबर! सराफा बाजार उघडताच सोनं झालं स्वस्त; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Phone Charging Tips : चार्जर नाही, तर काय झाले; 'या' स्मार्ट ट्रिक्स वापरून मिनिटांत मोबाईल फोनची बॅटरी होईल फुल

SCROLL FOR NEXT