

जिल्हा परिषद निवडणुकांआधी उद्धव सेनेला मोठा धक्का
ठाकरे गटाच्या माजी आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश
लातूर जिल्ह्यातील राजकारण तापलं
नगरपालिका, नगरपरिषदा, महापालिकांनंतर आता जिल्हा परिषेदच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. नगर पालिका, परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपनं मोठ्या प्रमाणात इतर पक्षातील नेत्यांनी फोडून त्यांना आपल्या आपल्या पक्षात प्रवेश करून घेतला. यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही तोच ट्रेंड फॉलो केला जातोय. आता भाजपनं लातूरमध्ये उद्धव सेनेला मोठा धक्का दिलाय. ठाकरे सेनेच्या माजी आमदारांनीच ठाकरेंच्या सेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
भाजपमध्ये प्रवेश करताना माजी आमदार माने यांनी ठाकरे सेनेवर टीका केलीय. त्यांनी पक्षातील कार्यपद्धतीवर टीका करत भाजपचं कमळ हाती घेतलं. लातूरमध्ये पक्ष वाढवण्यासाठी ठाकरे सेनेच्या नेतृत्त्वाने लक्ष दिलं नसल्याचा आरोप आमदार दिनकर माने यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांदरम्यान मोठ्या प्रमाणात पक्षांतर पाहायला मिळाले.
त्यानंतर आता १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. याच निवडणुकीच्या धामधुमीत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय.औसाचे माजी आमदार दिनकरराव माने यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
औसा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिनकरराव माने, उपजिल्हाप्रमुख संतोष सूर्यवंशी, तालुका प्रमुख आबासाहेब पवार, तालुका संघटक श्रीराम कुलकर्णी, माजी तालुका प्रमुख संजय उजळबे, तालुका समन्वयक प्रदीप रणखांब, उप तालुका समन्वयक महादेव साळुंखे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना लातूर जिल्ह्यात शिवसेना सक्षमपणे उभी करण्याचं आणि जिवंत ठेवण्याचे काम आम्ही केलं. आम्हाला लोकांनी भरभरून प्रेम दिलं, आमदार केले. मात्र त्यानंतर शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने लातूर जिल्ह्याकडे लक्ष दिलं नाही. संघटनात्मक पातळीवर शिवसेना कमजोर होत गेली.
शिवसैनिकांची कामे वेळेवर होत नसल्याचा आरोपही दिनकर माने यांनी केला. सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही. महाराष्ट्राचे सक्षम नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सर्वसामान्यांसठी काम करावे या अपेक्षेने भाजपमध्ये पक्षप्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.