

महाड नगरपालिका निवडणूक राडा प्रकरणात मोठी अपडेट
विकास गोगावले यांच्यासह शिवसेनेच्या ८ आरोपींना जामीन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५ आरोपींना न्यायालयीन कोठडी
महाड नगरपालिका निवडणूक राडा प्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना जामीन मंजूर करण्यात आलाय. शुक्रवारी शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही गटातील १३ आरोपी पोलिसांना शरण गेले होते.महाड नगरपालिका निवडणूक राडा प्रकरणी मोठी अपडेट समोर आलीय. विकास गोगावले यांच्यासह शिवसेनेच्या ८ आरोपींना जामीन मंजूर करण्यात आलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५ आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.
महाड मारहाण प्रकरणी शिवसेनेच्या विकास गोगावले यांच्या आत्मासमर्पण नंतर राष्ट्रवादीचे आरोपीदेखील महाड तालुका पोलीस ठाण्यात हजर झाले. विकास गोगावले यांच्यासाह शिवसेनेच्या ७ जणांनी सकाळी महाड शहर पोलीस ठाण्यात शरणागती पत्कारली होती. त्यानंतर सुमारे ५ तासाभरानंतर राष्ट्रवादीच्या आरोपींनी देखील समर्पण केलं होतं.
महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. महाड नगरपालिका निवडणुकीवेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये तुफान हाणामारी झाली होती. या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते.
दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी न्यायालयात अटक पूर्व जमिनासाठी धाव घेतली होती. त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं होतं. त्याचवेळी न्यायालयाने आरोपींचा अटकपूर्व जामीन नाकारलं होता.न्यायालयाने फटकारल्यानंतर आरोपींनी आत्मसमर्पण केलं होतं. मंत्र्यांची मुले गुन्हा करून मोकाट फिरतात, मंत्र्यांच्या संपर्कात राहतात, पण पोलिसांना ते सापडत नाहीत.
राज्यात कायदा, सुव्यवस्था आहे का नाही? मुख्यमंत्री या प्रकरणी गप्प का? ते इतके हतबल आहेत का ते मंत्र्यांविरोधात बोलू शकत नाहीत? अशा प्रकारचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाने ओढले होते. यानंतर विकास गोगावले यांनी शुक्रवारी सकाळी १०.३० च्या दरम्यान पोलीस ठाण्यात हजर झाले होते.
या प्रकरणात माणगाव सत्र न्यायालयाने या सर्वांचे अटकपूर्व जामीन फेटाळले होते. त्यांनतर अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी उच्च न्यायालयात प्रयत्न सुरू असतानाच उच्च न्यायालयाच्या एकल पीठाने सुनावणी दरम्यान गुरुवारी कानउघाडणी केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.