'अख्ख्या महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू'; गळ्यात भगवं उपरणं घालून इम्तियाज जलील यांचं मुंब्र्यात वक्तव्य

Imtiaz Jaleel Statement On Green Colour : पुढील काळात महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू, असं वक्तव्य MIMचे नेते इम्तियाज जलील यांनी केलंय. मुंब्र्यात MIMच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांची त्यांनी भेट घेतली. यावेळी इम्तियाज जलील भगवं उपरण घालून आले होते.
Imtiaz Jaleel Statement On  Green Colour  :
AIMIM leader Imtiaz Jaleel during his visit to Mumbra after the municipal election results.saam tv
Published On
Summary
  • मुंब्रा निवडणूक विजयानंतर AIMIMकडून शक्तीप्रदर्शन

  • इम्तियाज जलील यांचं “अख्ख्या महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू” विधान

  • सहर शेख यांच्या भाषणाचा व्हायरल व्हिडिओ व त्यावरून वाद

ठाणे महानगरपालिकेच्या मुंब्रा भागातून विजयी झालेल्या सहर शेख यांच्या विधानानंतर आता एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी हिरव्या रंगाचे विधान केलंय. येणाऱ्या दिवसात नुसतं मुंब्रा नाहीतर अख्ख्या महाराष्ट्रात आमच्या हिरव्या रंगाला पसरवू, असं विधान त्यांनी आज केलंय. जलील हे आज मुंब्य्रात आले होते, त्यांनी नवनिर्वाचित नगसेविका सहर शेख यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हिरवा रंग पसरवण्याचं विधान केलंय.

सहर शेख यांनी AIMIM ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाकडून महानगरपालिकेच्या निवडणूक लढवली होती. निकालानंतर एका जाहीर सभेतील सहर शेख यांचा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. भाषणा करतानाची त्यांची ‘कैसा हराया’ हे बोलण्याच्या स्टाइलमुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. याच भाषणात त्यांनी संपूर्ण मुंब्रा हिरवा करणार अलं विधान केलं होतं. त्यावरून चांगलाच वाद रंगला होता.

Imtiaz Jaleel Statement On  Green Colour  :
Zilla Parishad Election: राज्यात भाजपचा धमाका! ZP निवडणुकीआधीच उडवला विजयाचा बार, कोकणात १० जण बिनविरोध, विरोधकांना मोठा धक्का

भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून त्यांच्यावर टीका केली जाऊ लागली. इतकेच नाही तर सहर शेख यांनी वादग्रस्त विधान करून नये. चिथावणीखोर वक्तव्य करु नये अशी नोटीसदेखील मुंब्रा पोलिसांनी बजावली होती. त्यानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) नगरसेविका सहार शेख यांनी आपल्या एका वक्तव्याबद्दल माफी मागितली.

आता इम्तियाज जलील यांचं विधान व्हायरल

AIMIMच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्या विधानावरून निर्माण झालेल्या वादानंतर आज इम्तियाज जलील यांनी त्यांची भेट घेतली. आज मुंब्य्रात आले असताना त्यांनी हिरव्या रंगाबाबत विधान केलंय. सहर शेख यांनी केलेले विधान चुकीचं नसल्याचं त्यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ दाखवला., हा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरमधील आहे.

Imtiaz Jaleel Statement On  Green Colour  :
ZP Election: कोकणात पुन्हा बिनविरोध! जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध

तेथील एका सभेत बोलताना फडणवीस म्हणाले होते की, आज भगव्या छत्रपती संभाजीनगरची लाज राखली. या व्हिडिओवरून बोलताना जलील म्हणाले, तुम्ही भगवा रंगाबाबत बोलू शकतात. आणि जेव्हा आमच्या पक्षाच्या नगरसेविकाने हिरवा रंगाबाबत विधान केलं तर ते चुकीचं कसं? असा सवाल इम्तियाज जलील यांनी केलाय. पुढेल बोलताना जलील म्हणाले, आता पुढील काळात फक्त मुंब्रा नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात आमचा हिरवा रंग पसरवू, असं वादग्रस्त विधान केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com