ZP Election: कोकणात पुन्हा बिनविरोध! जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध

Konkan Zilla Parishad Election: राज्यात होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही बिनविरोध पॅटर्न पाहायला मिळत आहे. कोकणात अजून दोन उमेदवार बिनविरोध निवडणून आलेत.
Konkan Zilla Parishad Election
BJP candidates celebrate after winning Zilla Parishad and Panchayat Samiti seats unopposed in Konkan region.Saam tv
Published On
Summary

कोकणात भाजपचा बिनविरोध विजयाचा सिलसिला सुरू

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत दोन जागा बिनविरोध

ठाकरे शिवसेनेला कणकवली तालुक्यात मोठा धक्का

नगरपालिका,नगरपंचायत आणि महापालिकेनंतर आता झेडपीमध्येही भाजपकडून बिनविरोध पॅटर्न राबवला जात आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आता पुन्हा भाजपच्या दोन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. कणकवली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपकडून ठाकरे शिवसेनेला धक्का तंत्राचा सलग सपाटा लावण्यात आला आहे.

आज सलग दुसऱ्या दिवशी खारेपाटण जिल्हा परिषदमधील ठाकरे सेनेच्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी जिल्हा परिषद सदस्य पदाच्या निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार प्राची इस्वलकर या बिनविरोध झाल्या. त्यानंतर सावंतवाडीतील बांदा जिल्हा परिषदेत भाजपचे उमेदवार माजी सभापती प्रमोद कामत बिनविरोध ठरले आहेत.

Konkan Zilla Parishad Election
ZP Election: ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का; उमेदवारी नाकारताच कमळाकडे धाव, बड्या नेत्यानं पक्षाला ठोकला रामराम

कणकवली तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाकडून ठाकरे सेनेला धक्के दिले जात आहेत. खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातील ठाकरे सेनेच्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी जिल्हा परिषद सदस्य पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे प्राची इस्वलकर या बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे कणकवली तालुक्यात बिनविरोध निवडून आलेल्या भाजपाच्या पंचायत समिती उमेदवारांची संख्या 2 तर जिल्हा परिषद 1 अशा तिघांची बिनविरोध निवड झाली आहे.

Konkan Zilla Parishad Election
Zilla Parishad Election: जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी होणार? महापालिकांसाठी घोषणा झाली, ZP निवडणुकांचे बिगुल कधी वाजणार?

खारेपाटण जिल्हा परिषद मधील ठाकरे सेनेच्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने हा ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. तर भाजपने निवडणुकी आधीच जिल्हापरिषदेत आपले खाते उघडले आहेत. सावंतवाडीतील बांदा जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचे उमेदवार माजी सभापती प्रमोद कामत बिनविरोध ठरलेत. अपक्ष उमेदवार सुशांत पांगम यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत.

ठाकरेंच्या शिवसेनेकडून बांद्यामध्ये उमेदवार देण्यात आला नव्हता. याठीकाणी अपक्ष उमेदवार रिंगणात होता मात्र या उमेदवाराने आपली उमेदवारी मागे घेतल्याने भाजपचे प्रमोद कामत हे बिनविरोध ठरले आहेत. यामुळे भाजपचे दोन उमेदवार जिल्हापरिषदेत बिनविरोध निवडून गेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com