ZP Election: ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का; उमेदवारी नाकारताच कमळाकडे धाव, बड्या नेत्यानं पक्षाला ठोकला रामराम

Pandharpur ZP Election: सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तिकीट नाकारल्यानंतर नाराज कल्याणराव काळे यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Pandharpur ZP Election
Former NCP leaders along with supporters after joining the BJP ahead of Solapur Zilla Parishad elections.Saam
Published On
Summary
  • ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का

  • उमेदवारी नाकारल्यानंतर नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

  • सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय उलथापालथ

सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्रपणे लढणार आहेत. मात्र त्याचवेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्का बसलाय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर पंढरपूर आणि माढ्यातील सर्व सूत्रे आमदार अभिजीत पाटील यांच्याकडे गेली आहेत. अभिजीत पाटील यांनी लागलीच आपला राजकीय डाव खेळत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांच्या समर्थकांना उमेदवारी देण्यास नकार दिला. त्यामुळे नाराज झालेल्या नेत्यांनी कमळाकडे धाव घेत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय.

Pandharpur ZP Election
Zilla Parishad Election: राजीनामा सत्र थांबता थांबेना! ऐन निवडणुकीत अजित पवारांना तिसरा मोठा धक्का, पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

उमेदवारी नाकारल्यानंतर कल्याणराव काळे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांची कोंडी झाली. पक्षात झालेली कोंडी फोडण्यासाठी अखेर कल्याणराव काळे, त्यांचे बंधू राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे आणि गणेश पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय आणि समर्थकांची उमेदवारी निश्चित केली. समाधान काळे यांच्या पत्नी मोनिका काळे यांना भाजपने वाखरी, तर गणेश पाटील यांच्या मातोश्री प्रफ्फुलता पाटील यांना भोसे जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दिलीय.

Pandharpur ZP Election
Maharashtra Politics: दोन्ही शिवसेना एकत्र येणार? राज्याच्या राजकारणात उलटफेर होणार, 3 बड्या नेत्यांच्या भेटीनं चर्चांना उधाण

एकीकडे राष्ट्रवादीतील नेत्यांनी भाजपतून प्रवेश करत जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळवली. दुसरीकडे भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिलीय. त्यामुळे पंढरपूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचे पहायला मिळाली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आमदार अभिजीत पाटील आणि विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांच्यामध्ये युती होणार असल्याची चर्चांनी जोर धरलाय. यामध्ये आमदार पाटील हा जिल्हा परिषदेच्या, तर भालके गट हा पंचायत समितीच्या सर्व जागांवर लढवणार असल्याचा फॉर्म्युला देखील ठरल्याचं सांगितलं जात आहे.

Pandharpur ZP Election
Nashik Politics: नाशिकमध्ये शिंदेंनी डाव टाकला, बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश; शरद पवारांना मोठा धक्का

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर उमेदवार निवडीचे सर्व अधिकार आमदार अभिजीत पाटील यांच्याकडे आहेत. त्यानंतर पाटील यांनी काळेंच्या समर्थकांना उमेदवारी देण्यास नकार दिला, त्यामुळे कल्याणराव काळे, गणेश पाटील, समाधान काळे यांच्यासह समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. पक्ष प्रवेशाचा निर्णय झाल्यानंतर भाजपने काळे गटाच्या उमेदवारांना पक्षाचे एबी फॉर्म दिलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com