

झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान
निवडणुकीआधीच कोकणात भाजपचे १० उमेदवार बिनविरोध निवडून आले
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व कणकवली पंचायत समितीत भाजपचा दबदबा
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी फेब्रुवारी महिन्याच्या ५ तारखेला मतदान होणार आहे. तर या मतदानाचे निकाल दुसऱ्या दिवशी लागणार आहे, मात्र त्याआधीच राज्यात भाजपची हवा पाहायला मिळत आहे. झेडपी निवडणुकीआधीच कोकणात भाजपच्या १० उमेदवारांची बिनविरोध निवड झालीय. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि कणकवली पंचायत समितीत भाजपने विजयाचा बार उडवलाय. यामुळे महापालिका निवडणुकीत चर्चेत आलेला बिनविरोध पॅटर्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय.
राज्यात पार पडलेल्या नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीत भाजपने जागा सर्वाधिक जागा बिनविरोध जिंकल्या होत्या. त्या पाठोपाठ झालेल्या महापालिका निवडणुकीत देखील भाजपने सर्वांधिक नगरसेवक बिनविरोध निवडून आले होते. यानंतर आता होऊ घातलेल्या राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये देखील बिनविरोध निवडणुकांचा पॅटर्न दिसून येत आहे. कोकणातील रत्नागिरी आणि तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला निवडणुकीच्या आधीच गुलाल लागला.
कणकवली पंचायत समितीच्या बिडवाडी मतदार संघात ठाकरे गटाच्या उमेदवार विद्या शिंदे यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. यामुळे भाजपच्या उमेदवार संजना राणे यांची बिनविरोध निवड झाली. तर नितेश राणे यांच्या कणकवली मतदारसंघात बिनविरोध निवडीचे सत्र भाजपकडून सुरूय. बिडवाडी पंचायत समितीमध्ये बिनविरोध निवड झाल्यानंतर आता वरवडे पंचायत समितीत भाजपचे अधिकृत उमेदवार सोनू सावंत यांच्याविरोधातील विरोधकांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे सोनू सावंत यांची बिनविरोध निवड झाली. कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जापैकी चार अर्ज शुक्रवारी मागे घेण्यात आलेत.
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग( बिनविरोध)
१) खारेपाटण जि.प.उमेदवार; प्राची इस्वालकर(भाजप)
२)बांदा जिल्हा प. उमेदवार प्रमोद कामत (भाजप)
३)जाणवली जि. प. उमेदवार; रुहिता राजेश तांबे ( भाजपची कार्यकर्ती उमेदवार शिवसेना)
४)पडेल – जिल्हा परिषद;सुयोगी रविंद्र घाडी (भाजप)
५)बापर्डे – जिल्हा परिषद ;अवनी अमोल तेली (भाजप)
पंचायत समिती कणकवली( बिनविरोध)
१)वरवडे पंचायत समिती सोनू सावंत (भाजपा)
देवगड तालुक्यातील पंचायत समिती(बिनविरोध)
१)पडेल –अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप)
२)नाडण –गणेश सदाशिव राणे (भाजप)
३)बापर्डे – संजना संजय लाड (भाजप)
पंचायत समिती वैभववाडी( बिनविरोध)
१)कोकिसरे; सौ.साधना सुधीर नकाशे (भाजप)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.