गाड्यांचा ताफा, हातात शस्त्र, २५ किमी लांब रोड शो; सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींचे शक्तीप्रदर्शन, पाहा व्हिडिओ

Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत काहीजण चारचाकी, दुचाकी गाड्यांसह शक्तीप्रदर्शन करत असल्याचे पाहायला मिळते. हे लोक एका सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी असल्याचे म्हटले जात आहे.
Crime News
Crime NewsX
Published On

सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सामूहित बलात्कार केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या आरोपींनात आलिशान गाड्यांमधून रस्त्यावरुन फिरत असल्याचे पाहायला मिळते. तुरुंगातून सुटल्यानंतर मित्रांकडून एखाद्या सिनेमामधील हिरोप्रमाणे सर्व आरोपींचे स्वागत करण्यात आले. आरोपींची २५ किमी लांब मिरवणूक काढण्यात आली. गाडीतून फिरताना सर्वांकडे शस्त्र असल्याचे म्हटले जात आहे. या व्हायरल व्हिडीओनंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत प्रशासनावर निशाणा साधला आहे. सदर घटना कर्नाटकमधील हावेरी जिल्ह्यात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सात आरोपींवर अपहरण आणि सामूहिक बलात्काराचे आरोप आहेत. त्यांना नुकताच तुरुंगातून जामीन मिळाला. तुरुंगातून सोडताच बाहेर उभे असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी, मित्रांनी आरोपींचे स्वागत केले. तुरुंगापासून अक्की अलूर शहरापर्यंत कारच्या ताफ्यात २५ किमी लांब मिरवणूक काढली आणि एका प्रकारे शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला.

Crime News
Shocking : वैष्णवीनंतर पुन्हा संतापजनक प्रकार, हुंड्यामुळे सोलापुरात विवाहितेला मारहाण, विष पाजण्याचा प्रयत्न; महाराष्ट्र पुन्हा हादरला

आफताब, मदार साब मंदाक्की, समिउल्ला, मोहम्मद सादिक, शोएब मुल्ला, तौसीफ छोटी आणि रियाझ साविकेरी अशी सात आरोपींची नावे आहेत. हावेरी सत्र न्यायालयात जेव्हा पीडिता आरोपींना नीट ओळखू शकली नाही, तेव्हा न्यायाधीशांनी सातही आरोपींचा जामीन मंजूर केला. सुटका होताच आरोपींनी आनंद साजरा केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Crime News
Vaishnavi Hagawane : वैष्णवीचं बाळ लपवणारे कोण? हापापलेल्या हागवणेंची खुनशी मानसिकता

हावेरी सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे कर्नाटकमध्ये मोठी खळबळ उडाली होती. ७ जानेवारी २०२४ रोजी ही घटना घडली होती. आरोपींनी पीडितेला हॉटेलमध्ये नेले. त्यानंतर पीडितेवर हल्ला केला. अत्याचारानंतर तिला एका लॉजजवळ सोडले. १० जानेवारी रोजी लॉजच्या स्टाफने पोलिसांनी याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी सामूहिक बलात्कारासह गंभीर कलमांखाली अनेक गुन्हे दाखल केले.

Crime News
Vaishnavi Hagawane : सासरच्यांकडून होणारा छळ नाही, तर वैष्णवीचं सर्वात मोठं दु:ख 'हे' होतं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com