amravati  Saam tv
महाराष्ट्र

काँग्रेसला मोठा हादरा; पक्षातील बड्या नेत्याने साथ सोडली, आता शिंदे गटाच्या वाटेवर?

amravati congress News : काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. बड्या नेता पक्षाची साथ सोडत शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Vishal Gangurde

राज्यात पुन्हा राजकीय घडामोडींना वेग

अमरावतीमधील काँग्रेसच्या बड्या नेत्याचा पक्षाचा राजीनामा

काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला नेता शिंदे गटाच्या वाटेवर

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी आतापासूनच आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. अमरावती जिल्ह्यातही राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाने बच्चू कडू यांच्यावर विदर्भाची जबाबदारी सोपवली. कडू यांच्याकडे जबाबदारी सोपवल्यानंतर आता काही दिवसांतच काँग्रेसचा बडा नेता शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

अमरावती दर्यापूरमध्ये आज मंगळवारी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काँग्रेसचे स्थानिक नेते सुधाकर भारसाकळे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दर्यापूरच्या काँग्रेस नेत्यांनी मला विश्वासात घेतलं नाही, असा आरोप सुधाकर भारसाकळे यांनी केला. काँग्रेसमधील अंतर्गत कलहाला कंटाळून सुधाकर भारसाकळे यांनी दुर्यापूर तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सुधाकर हे लवकरच शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुधाकर भारसाकळे हे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत. तसेच ते भाजपचे आमदार प्रकाश भारसाकडे यांचे भाऊ आहेत.

अलीकडे नगरपरिषदेच्या निवडणुकीपासूनच दर्यापुरात राजकीय घडामोडींना वेग आला होता. भारसाकळे यांनी बळवंत वानखेडे आणि जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्यावर नाराजी व्यक्त करत राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले. याआधी जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब हिंगणीकर याांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता.

भारसाकळे यांनी काय आरोप केला होता?

भारसाकळे म्हणाले होते, दर्यापुर नगरपरिषदेच्या निवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवारांची तिकिटे ऐनवेळी जिल्हाध्यक्ष आणि खासदारांनी नाकारली गेली होती. नगरसेवक आणि त्यांच्यात वाद निर्माण करण्याचे कामही काही नेत्यांकडून करण्यात आलं. काही दिवसांपूर्वीच दर्यापूरमध्ये अल्पसंख्याक सेलच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यावेळी मला कुठलीही कल्पनाही देण्यात आली नव्हती, असे ही ते म्हणाले.

विदर्भात बच्चू कडू यांच्यावर मोठी जबाबदारी

शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विधानपरिषदेचे आमदार बच्चू कडू यांना विदर्भात सोमवारी पक्ष वाढीसाठी मोठी जबाबदारी देण्यात आली. आमदार बच्चू कडू यांची शिवसेना पक्षाच्या विदर्भ विभागीय नेतेपदी नियुक्ती केली. बच्चू कडू यांना विदर्भात शिवसेना पक्षाच संघटन,शाखा बांधणी आणि पक्ष वाढीसाठी ही जबाबदारी दिल्याचे बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banan Benefits: सकाळी रिकाम्या पोटी केळी खावी की नाही? जाणून घ्या हे ७ फायदे आणि परिणाम

Maharashtra News Live Update: वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Election Results : काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला, बहुमत नसतानाही भाजपची सत्ता, क्रॉस व्होटिंगने पलटला सगळा खेळ

SBI Customers Alert: SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! सलग 5 दिवस बँकिंग सेवा ठप्प होणार

Health Care: सुट्टीच्या दिवशी जास्त वेळ झोपता? मग ही सवय वेळीच मोडा नाहीतर होऊ शकतो शरिरावर हा गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT