congress leader satej patil worries in kolhapur about cities law and order Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur Law and Order : कोल्हापुरातील कायदा व सुव्यवस्था ढासळली; सतेज पाटील यांना का सतावतेय चिंता?

congress leader satej patil worries in kolhapur about cities law and order: रत्नागिरी नागपूर शक्तीपीठ महामार्ग याच्या विराेधात उद्या (मंगळवार) काेल्हापूरात माेर्चा काढण्यात येणार आहे. उद्याचा मोर्चा मोठ्या शक्तीने होणार आहे असेही आमदार सतेज पाटील यांनी नमूद केले.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

कोल्हापुरात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. सध्या अनेक प्रकरणं समोर येत आहेत. पोलिस यंत्रणा राजकीय यंत्रणेत अडकल्याचे दिसत आहे असे मत काॅंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले. पाेलिसांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा आमदार पाटील यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केली.

सते पाटील यांनी कळंबा कारागृह येथे झालेल्या घटनांबाबत देखील नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले जेल यंत्रणेमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड झाला आहे. कळंबा कारागृहात दर दोन दिवसाला नवनवीन गोष्टी सापडत आहेत. याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

आमदार पाटील पुढं बाेलताना म्हणाले दर दोन दिवसाला एक खून कोल्हापुरात होत आहे. काही महत्वाच्या ठिकाणी चाे-या देखील झाल्या आहेत. पाेलिसांनी शहराचे वातावरण बिघडू पाहणा-या लाेकांचा शाेध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी अपेक्षा आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: दिप्तीनंतर आता कीर्ती! बाथरुममध्ये कोंडलं, बेदम मारलं; १०लाखांसाठी अमानुष छळ; आणखी एका विवाहितेनं संपवलं आयुष्य

चंद्रपूरचा महापौर भाजपचा की काँग्रेसचा? महापालिकेची सूत्रं 'मातोश्री'च्या हाती? VIDEO

Special Report : महायुतीत ठणाठणी! शिंदेसेनेचं भाजपच्या नाईकांना ओपन चॅलेंज

व्हॉट्सअॅपसाठी पैसे मोजावे लागणार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Zilla Parishad Election: भाजपनं ठाकरेंचा उमेदवार पळवला? पनवेल तहसील कार्यालयावर शेकापचा राडा, माघार घेण्यावरून रंगला राजकीय ड्रामा

SCROLL FOR NEXT