Kolhapur : काेल्हापूरच्या जनतेला नेता फसवा असल्याचं कळलं आहे; थेट पाईपलाईनच्या पाण्यावरुन धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका (video)

Kolhapur News : दिवाळीत जाऊन ज्यांनी अभ्यंग स्नान केले ते फसवे आहेत. हे काेल्हापूरातील जनतेला कळून चुकलं आहे असे खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केले.
Satej Patil,  Dhananjay Mahadik
Satej Patil, Dhananjay Mahadik Saam Tv

- रणजीत माजगावकर

Kolhapur Latest Marathi News :

काेल्हापूरच्या जनतेला कळलं आहे हा नेता फसवा आहे. त्यामुळे जनता देखील आता आमचं ठरलय असे म्हणत आहे. जनतेने काय ठरवलेले आहे हे या आगामी काळातील निवडणुकीत (lok sabha election 2024) दिसेलच असे मत खासदार धनंजय महाडिक (mp dhananjay mahadik) यांनी आमदार सतेज पाटील (mla satej patil) यांच्यावर टीका करताना व्यक्त केले. दरम्यान थेट पाईपलाईनच्या कामात मला लक्ष घालावं लागेल, असं वाटतंय असेही खासदार महाडिक यांनी आज (बुधवार) माध्यमांशी बाेलताना नमूद केले. (Maharashtra News)

खासदार धनंजय महाडिक यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना दिवाळी होऊन पाच महिने झाले तरी आज अखेर थेट पाईपलाईनचे पाणी कोल्हापूरला मिळाले नाही अशी खंत व्यक्त केली. पुढं बाेलताना खासदार महाडिक म्हणाले काेल्हापूरला थेट पाईपलाईनचे पाणी मिळण्यासाठी आता मला या कामातसुद्धा लक्ष घालावं लागेल, असं वाटतंय.

खासदार महाडिक म्हणाले दिवाळीत जाऊन ज्यांनी अभ्यंग स्नान केले ते फसवे आहेत हे जनतेला कळून चुकले आहे. हे पाणी न मिळण्याची अनेक कारणे सांगितली जातात. यामुळे थेट पाईपलाईनचे पाणी मिळण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे असे वचन आज महाडिक यांनी काेल्हापूरवासियांना दिले. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Satej Patil,  Dhananjay Mahadik
Bhandara : शेतकऱ्यांचे पैसे अडवले तर याद राखा!; भाजप खासदार सुनील मेंढेंनी सरकारी अधिकाऱ्याला धरलं धारेवर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com