- शुभम देशमुख
आमच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. आम्हांला पैशांची आवश्यकता आहे. किती दिवस आम्ही थांबायचे असे गा-हाणे शेतकऱ्यांनी भाजप खासदार सुनील मेंढे (BJP MP Sunil Mendhe) यांच्याकडे मांडले. त्यानंतर खासदार मेंढे यांनी जिल्हा पणन अधिकारी यांच्याशी संपर्क साधत त्यांना झापलं. शेतकऱ्यांना त्रास दिला तर तुमची गय केली जाणार नाही असा सज्जड दमही खासदार मेंढे यांनी अधिका-यास दिला. (Maharashtra News)
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात खासदार सुनील मेंढे यांचा संपर्क दौरा सुरु आहे. आसगाव मधील शेतकऱ्यांनी खासदार मेंढे यांच्याकडे त्यांची समस्या मांडली. जिल्हा पणन अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याची तक्रार शेतक-यांनी खासदार सुनील मेंढे यांच्याकडे केली.
त्यानंतर खासदार मेंढे यांनी जिल्हा पणन अधिकारी यांना फोन लावला. दाेघांचा संवाद सुरु असतानाच मेंढे जिल्हा पणन अधिकारी यांच्यावर संतापले. त्यांनी जिल्हा पणन अधिकारी यांस चांगलेच धारेवर धरले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
धान खरेदी केंद्र आपल्या कामात अफरातफर करत असतील तर त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा. ते अधिकार तुमच्याकडे आहे. मात्र खबरदार तुम्ही शेतकऱ्यांना त्रास दिला तर. तुमची गय केली जाणार नाही असा सज्जड दमच मेंढेंनी अधिका-यांना भरला.
दोन दिवसात संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा करा असा आदेशच खासदार मेंढे यांनी जिल्हा पणन अधिकारी यांना दिला. शेतकऱ्यांचे पैसे अडवायचे नाहीत जे काही करायचे आहे ते तुम्ही धान खरेदी केंद्रावर करा. शेतकऱ्यांना नाहक त्रास द्यायचा नाही असेही खासदार मेंढेंनी अधिकाऱ्याला खडसावले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.