Beed : माजलगाव पंचायत समितीवर चिंचगव्हाण गावातील महिलांचा ठिय्या, 'ते' अतिक्रमण हटविण्याची मागणी

गावातील अतिक्रमणधारकांनी अडवलेली नाली तातडीने खुली करावी अन्यथा पंचायत समितीच्या दारातून उठणार नाही असा पवित्र ग्रामस्थ महिलांनी घेतला आहे.
chinchgavan grampanchayat encroachment issue villagers protest at panchayat samiti
chinchgavan grampanchayat encroachment issue villagers protest at panchayat samitisaam tv
Published On

Beed News :

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील चिंचगव्हाण ग्रामपंचायतची (chinchgavan grampanchayat) नाली अतिक्रमणधारकांनी अडवल्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही नाली अडवल्याने ग्रामस्थांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायात देखील यावर काही मार्ग काढत नसल्याने महिला वर्ग संतप्त झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या अतिक्रमणाची तक्रार ग्रामस्थांनी गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रामपंचायत, माजलगाव पंचायत समिती कार्यालयामध्ये निवेदन दिले आहेत. मात्र अद्याप पर्यंत ही नाली मोकळी केली गेली नाही.

chinchgavan grampanchayat encroachment issue villagers protest at panchayat samiti
Ajit Pawar : यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ उर्जा व प्रेरणा स्त्रोत : अजित पवार

यामुळे नालीत मोठमोठ्या आळ्या झाल्याने ग्रामस्थ आजारी पडत आहेत. यामुळं संतप्त ग्रामस्थांनी आज (मंगळवार) माजलगाव पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. (Maharashtra News

या आंदोलनामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. गावातील अतिक्रमणधारकांनी अडवलेली नाली तातडीने खुली करावी अन्यथा पंचायत समितीच्या दारातून उठणार नाही असा पवित्र ग्रामस्थ महिलांनी घेतला आहे.

Edited By : Siddharth Latkar

chinchgavan grampanchayat encroachment issue villagers protest at panchayat samiti
Vitthal Rukmini Darshan: विठ्ठल रूक्मिणीचे पदस्पर्श दर्शन शुक्रवारपासून राहणार बंद, जाणून घ्या कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com