congress leader balasaheb thorat meets shamkant saner dhule lok sabha election 2024  Saam Digital
महाराष्ट्र

Dhule Constituency : धुळ्यात उमेदवार बदलाच्या चर्चेला पूर्णविराम, बाळासाहेब थाेरातांच्या भेटीनंतरही शामकांत सनेरांची मेळाव्यास पाठ

शामकांत सनेर यांची नाराजी बाळासाहेब थोरात यांच्या भेटी नंतर दूर होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले हाेते. सनेर यांच्या निवास स्थानकाबाहेर कार्यकर्त्यांची माेठी गर्दी हाेती.

भूषण अहिरे

Dhule Congress News :

काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आज (मंगळवार) धुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांची भेट घेतली. या भेटीनंतर देखील काॅंग्रेस पक्षातील नेत्यांवर नाराज असलेल्या सनेर यांची मनधरणी हाेऊ शकलेली नाही. तर दूसरीकडे धुऴे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बदलाच्या सर्व चर्चांना बाळासाहेब थोरात यांनी आज पूर्णविराम दिला. यामुळे आगामी काळात सनेर यांची काय भूमिका असणार याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

धुळे मतदारसंघात महाविकास आघाडीतून काँग्रेसच्या शोभा बच्छाव (shobha bachhav) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे धुळे काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर हे नाराज झाले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ते व त्यांचे समर्थक मविआच्या काेणत्याच मेळाव्यांना उपस्थित राहत नाहीत. काही दिवसांपूर्वी बच्छाव यांनी सनेर यांची लवकरच पक्षश्रेष्ठी समजूत काढतील. काही दिवसातच ते आपल्या सोबत प्रचाराला असतील असा विश्वास साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केला हाेता.

आजच्या मेळाव्याला सनेरांची पाठ

आज काँग्रेसचे पक्ष श्रेष्ठी बाळासाहेब थोरात यांच्या भेटीनंतर देखील हे सनेर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. धुळ्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आदिवासी न्याय मेळाव्यात महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित असतांना सनेर यांची अनुपस्थिती हाेती. त्यांनी या मेळाव्याला सपशेल पाठ फिरवली हाेती.

सनेर भूमिकेवर ठाम

दरम्यान काँग्रेसचे नाराज जिल्हाध्यक्ष सनेर यांनी आपण अद्यापही आपल्या उमेदवारीवर ठाम असल्याचे साम टीव्हीला सांगितले. ते म्हणाले कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यानंतरच आपली भूमिका स्पष्ट करेन.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bahadurgad Fort History: छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला बहादूरगड, वाचा इतिहास

Skin Care Tips: दिवाळीत दिसा सुंदर! या 3 सोप्या घरगुती उपायांनी मिळवा नॅचरल ग्लो

Dhanteras Puja: धनत्रयोदशीची पूजा कशी करायची? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि साहित्य

Maharashtra Live News Update : निलेश घायवळचा जामीन रद्द करावा, पुणे पोलिसांची न्यायालयाला विनंती

Bigg Boss 19: 'तू खूप निर्लज आणि इरिटेटिंग...'; शेहबाजवर संतापला सलमान खान, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT