Prashant Padole accident  Saam
महाराष्ट्र

Accident : मोठी बातमी! नागपूरमध्ये काँग्रेस खासदाराच्या कारचा भीषण अपघात, ट्रकने दिली जोरदार धडक

Prashant Padole accident : खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या ताफ्याला नागपूरजवळ पुन्हा ट्रकची धडक बसली. एकाच मार्गावर तिसऱ्यांदा झालेल्या अपघातामुळे कटाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Namdeo Kumbhar

शुभम देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

Prashant Padole convoy accident Nagpur third time details : भंडारा-गोंदिया लोकसभेचे काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या ताफ्याला भीषण अपघात झालाय. आज सकाळी नागपूरजवळ एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातातून खासदार पडोळे आणि त्यांचे सहकारी सुदैवाने थोडक्यात बचावले आहेत. मात्र एकाच मार्गावर आणि एकाच पद्धतीने खासदार पडोळे यांच्यासोबत तिसरा अपघात झाला आहे. त्यामुळे यामागे घातपाताचा कट तर नाही ना? अशी शंका आता व्यक्त केली जात आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी दिल्लीला जाण्याकरिता खासदार डॉ. प्रशांत पडोळे आज सकाळी भंडारा येथून नागपूर विमानतळाच्या दिशेने निघाले होते. सकाळी त्यांचा ताफा नागपूरजवळील हल्दीराम समोर आला होता. त्याचवेळी मागून येणाऱ्या एका अनियंत्रित ट्रकने त्यांच्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की खासदारांच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने, एअरबॅग्ज आणि वेळेत मिळालेल्या संरक्षणामुळे डॉ. पडोळे यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.

या अपघातामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, डॉ. पडोळे यांच्यासोबत याच मार्गावर झालेला हा तिसरा अपघात आहे. तिन्ही वेळा अपघात एकाच मार्गावर झाले आहेत. तिन्ही वेळा ताफ्यातील गाडीला 'ट्रक'नेच धडक दिली आहे. अपघाताची पद्धतही तिन्ही वेळेस सारखीच असल्याचे समोर आले आहे.

एकाच लोकप्रतिनिधीसोबत वारंवार अशा घटना घडत असल्याने समर्थकांमध्ये आणि राजकीय क्षेत्रात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा केवळ योगायोग नसून यामागे एखादा मोठा कट किंवा घातपाताचा प्रयत्न असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकाच पद्धतीने वारंवार होणाऱ्या या अपघातामुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली.

खासदार डॉ. पडोळे यांच्या अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. धडक देणाऱ्या ट्रक चालकाला ताब्यात घेण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे. डॉ. पडोळे यांच्या अपघाताची माहिती मिळताच काँग्रेस काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

SCROLL FOR NEXT