Harshwardhan sapkal  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : दाऊदच्या मध्यस्थीने सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा गंभीर आरोप

Harshwardhan sapkal News : सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावरून काँग्रेसच्या बड्या नेत्याने भाजपवर टीका केली आहे. काँग्रेसच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई : नाशिकमधील सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाने राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावरून काँग्रेसने जोरदार निशाणा साधला आहे. दाऊद इब्राहिमच्या मध्यस्थीने सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने बैठकांचा सपाटा लावला आहे. काँग्रेसने मुंबईत बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीआधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. सपकाळ म्हणाले, 'दाऊद इब्राहिमच्या मध्यस्थीने सुधाकर बडगुजर यांचा प्रवेश झाला आहे का? आता दाऊदचा भाजप पक्षप्रवेश कधी होतोय याची प्रतिक्षा आहे'.

सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावर टीका करताना सपकाळ पुढे म्हणाले, 'देवेंद्र फडणवीस यांचे सभागृहातील भाषण ऐकवले. भाजप वॉशिंग मशीन आहे. हाताच्या कंगनाला आरसा कशाला. मिरची इकबाल मिरची गोड करून घेतली. आता कुत्र्याशी सोयरिक केली. चिक्की प्रकरण, जमीन घोटाळा. अगोदर क्लिनचीट दिली. चिक्की पिसिंग पिसिंग अँन्ड पिसिंग म्हटले आता गळा भेटिंग भेटिंग'.

मराठी भाषेवर भाष्य करताना सपकाळ म्हणाले, 'मराठी ही भाषा नाही अस्मिता नाही तर ही संस्कृती आहे. या संस्कृतीला भाजप संपवू पाहत आहे. कालच्या निर्णयाने हे सिद्ध केलं. हिंदीला आमचा विरोध नाही. केवळ काँग्रेस म्हणून नाही तर मराठी म्हणून आम्ही विरोध करत आहे. शासनाने तो निर्णय रद्द करावा. ट्रिपल इंजिनीअर सरकारला गणवेशाची काळजी नाही, पाठ्यपुस्तके पोचली की नाही त्याची काळजी नाही'.

'खासगी शाळेची फी वाढली आहे, त्याची काळजी नाही. धर्मावर मराठी संस्कृतीवर मायबोलीवर हे जे संकट आलं आहे, ते सर्व महाराष्ट्रातील लोकांनी हाणून पाडला पाहिजे. यापूर्वी आम्ही अनेक आंदोलन केली. संविधानाला न मानणारा विचार हा भाजपचा विचार आहे. काँग्रेस आणि भारताचा डीएनए एकच आहे. मात्र भाजप संविधान मानत नाही, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI Action: महाराष्ट्रातील दोन बँकांवर आरबीआयची कारवाई, एकाचा परवानाच रद्द , ठेवीदारांचा जीव टांगणीला

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण रुसली! दिवाळी तोंडावर, पण ₹ १५०० मिळेनात!

Maharashtra Live News Update: ..तर सरकारच्या विरोधात जाणार; मंत्री विखेंच्या भेटीनंतर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया

India vs South Africa : भारताच्या स्टार क्रिकेटपटूची हटके कामगिरी; अवघ्या २३ धावा करून २८ वर्ष जुना रेकॉर्ड मोडला

वास्तू शास्त्रानुसार 'या' ३ संकेतांकडे दुर्लक्ष करू नये

SCROLL FOR NEXT