Maharashtra Politics : पुण्यात एकनाथ शिंदे यांची ताकद वाढली; काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांची शिवसेनेला साथ

pune political News : पुण्यात काँग्रेस आणि शरद पवार गटाला मोठा झटका बसला आहे. पुण्यातील या दोन्ही पक्षातील दिग्गज नेते शिंदेंच्या शिवसेनेचं धनुष्यबाण हाती उचलणार आहेत.
Eknath shinde
Eknath Shinde welcomes Congress and NCP leaders into Shiv Sena during a key political event in Pune ahead of civic polls.Saam tv
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विरोधकांसहित सत्ताधारी पक्षांनी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. काही राजकीय पक्षांचे पक्षप्रवेश सुरु आहेत. पुण्यातही सत्ताधारी शिंदे गटाने नेते-कार्यकर्त्यांची मोट बांधायला सुरुवात केली आहे. पुण्यात आज मंगळवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात एकनाथ शिंदे यांची ताकद वाढणार असल्याचं बोललं जात आहे.

Eknath shinde
Maharashtra rain Update : राज्यात मुसळधार पावसाचा कहर! पुण्यानंतर कोल्हापुरातील पूल गेला वाहून

पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेने निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. पुण्यात शिंदेंच्या कार्यकर्त्यांना बैठकांचा सपाटा लावला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातीत दोन दिग्गज नेते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दोन्ही दिग्गज नेते पक्षप्रवेश करणार आहेत.

Eknath shinde
Aurangzeb Tomb : औरंगजेबाची कबर उखडून अरबी समुद्रात फेका; गृह विभागाकडे कुणी केली मागणी?

पुण्यातील काँग्रेसच्या प्रदेश सचिव सोनाली मारणे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माजी नगरसेवक राहुल तुपेरे, काँग्रेसचे शहर सरचिटणीस किरण मारणे, राष्ट्रवादीचे युवक सचिव आकाश कुसाळकर, पुणे शहर काँग्रेसचे सचिव संदीप शर्मा यांच्यासहित सामाजिक कार्यकर्ते गिरीश जैवळ,प्रसन्न पाटील यांचा शिवसेनेत अधिकृत प्रवेश होणार आहे.

Eknath shinde
Raja Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमच्या दिराचा खळबळजनक आरोप, नेमकं काय म्हणाला?

पुण्यातील दिग्गज नेत्यांच्या पक्षप्रवेशामुळे राजकारणात मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. पुण्यातील दिग्गज नेत्यांच्या एन्ट्रीमुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या शिवसेनेची ताकद वाढणार असल्याचं बोललं जात आहे.

Eknath shinde
Shocking : ऑनलाइन जुगारामुळे कर्जबाजारी झाला, २ वर्षांच्या मुलासह बायकोला विष दिलं, मग स्वत: टोकाचे पाऊल उचललं

सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश

नाशिकमधील सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. बडगुजर यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे. बडगुजर यांची काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर आज मंगळवारी बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशावेळी भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com