Maharashtra rain Update : राज्यात मुसळधार पावसाचा कहर! पुण्यानंतर कोल्हापुरातील पूल गेला वाहून

Maharashtra Rain update News : राज्यात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. पुण्यानंतर कोल्हापुरातील पूल वाहून गेल्याची घटना घडली आहे.
kolhapur
The washed-away bridge in Kolhapur after torrential rains caused severe flooding in the region, leading to traffic disruptionsSaam tv
Published On

कोल्हापूर : राज्यात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. पुण्यातील कुंडमळा येथील पूल कोसळला. त्यानंतर आज उल्हासनगरमध्ये नाल्यावरील पूल कोसळला. आता पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुरात पूल वाहून गेल्याची घटना घडली आहे. पूल वाहून गेल्याने वाहतूक बंद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील राधानगरीत पावसाचा जोर वाढला आहे. कोल्हापूरच्या राधानगरीतील मौजे चौके गावातील छोटा पूल वाहून गेला आहे. मौजे चौके गावाला जोडणारा छोटा पूल वाहून गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. मौजे चौके येथील लोखंडी पुलावरून फक्त पायवाट चालू असल्याची माहिती मिळत आहे. लोखंडी पूल सुस्थितीत असल्याची प्रशासनाने दिली आहे.

kolhapur
Pune Waterfall : पुण्यातील कधी न पाहिलेले ६ धबधबे; फोटो पाहून मन आनंदून जाईल

परभणीत पावसाचे आगमन

परभणीत अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पावसाचे आगमन झालं आहे. परभणीत सायंकाळच्या सुमारास १० मिनिटे जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे प्रचंड उकाड्याने त्रस्त असलेल्या परभणीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. एकीकडे शहरात पाऊस बरसत असताना जिल्हा मात्र अद्याप कोरडाच आहे. त्यामुळे सर्वदूर पावसाची आवश्यकता निर्माण झाली आहे.

kolhapur
Vasai-Virar Rain News : वसई-विरारमध्ये जोरदार पाऊस, सखल भागात साचलं पाणी|VIDEO

पुण्यात पावसामुळे वाहतूक कोंडी

पुणे-नाशिक महामार्ग,तळेगाव शिक्रापूर अशा दोन्ही मार्गावर चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांसह कामगारांचे हाल झाले आहेत. चाकण औद्योगिक क्षेत्रात सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. याच पावसात वाट काढत कामगारवर्ग कामावर गेला. मात्र आता परतीचा प्रवास करत असताना चाकणमधील दोन्ही महामार्गावर चार ते पाच किलोमीटरपर्यत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतुककोंडी झाल्याने मोठे हाल होत आहे.

मुंबईत मुसळधार

मुंबईच्या उपनगरात मुसळधार पाऊस बरसला. या पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. भांडुपमधील लाल बहादुर शास्त्री मार्गावर पाणी साचल्यामुळे वाहतूक एका बाजूने सुरु आहे. तर मुसळधार पावसामुळे अंधेरीतही सखोल भागात पाणी साचलं आहे.

नवी मुंबईला पावसाने झोडपलं

नवी मुंबई शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. वाशी, बेलापूर, खारघर, सानपाडा, नेरूळ या ठिकाणी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. कालपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये तुर्भे ते महापे एमआयडीसी रोडमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com