conduct election on ballot paper and not on evm demands citizens chandrapur
conduct election on ballot paper and not on evm demands citizens chandrapur saam tv
महाराष्ट्र

Chandrapur : ईव्हीएम हटाव; लोकशाही, संविधान वाचविण्यासाठी निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, चंद्रपूरमध्ये माेर्चा

संजय तुमराम

Chandrapur News :

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे भूमिपुत्र संघटनेच्या वतीने आज (गुरुवार) ईव्हीएम हटाव अशी मागणी करत मोर्चा काढला. या माेर्चात शेकडाे नागरिक सहभागी झाले हाेते. हा माेर्चा तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला. आंदाेलकांनी आगामी काळातील निवडणुका या बॅलेट पेपरच्या माध्यमातून घ्याव्यात अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनास केली. (Maharashtra News)

देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार मतदान यंत्राच्या (evm) साहाय्याने आले असल्याचे अनेक पुरावे निवडणूक आयोगाला देण्यात आले. मात्र त्यावर पांघरून घातले जात आहे. मतदान यंत्राच्या बळावर सत्ताधारी भाजप आज चारशे पारचा नारा देत आहेत. देशात विद्यमान सरकारबद्दल प्रचंड आक्रोश असताना आम्ही दिलेली मते कुणाला जातात, असा प्रश्न मोर्चेकऱ्यांनी उपस्थित केला.

शिक्षण, रोजगार, आरोग्य अशा मूलभूत सुविधाही मिळणे कठीण झाले आहे. लोकशाही आणि संविधान टिकवायचे असेल तर लोकांना त्यांचा मतदानाचा खरा अधिकार प्राप्त झाला पाहिजे आणि हा अधिकार केवळ मतदान पत्रिकेच्या माध्यमातूनच मिळू शकतो.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यामुळे ईव्हीएम बंद करण्याची गरज आंदोलकांनी केली. या मोर्चात महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. हातात मागण्यांचे फलक उंचावत, घोषणा देत हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. तिथे मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नितीन गडकरी आणि आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर

Maharashtra Weather Forecast: काळजी घ्या! आजही अवकाळीचा इशारा कायम, विजांच्या कडकडासह पावसाच्या सरी कोसळणार

Nigeria Bomb Blast: प्रॉपर्टीच्या वादातून प्रार्थनास्थळात बॉम्बस्फोट; ८ जणांचा मृत्यू, १६ जखमी

Mumbai Lok Sabha: मुंबईत आज पॉलिटिकल ब्लॉकबस्टर; शिवाजी पार्कवर PM मोदी अन् राज ठाकरे, तर बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तीप्रदर्शन

Rashi Bhavishya: आज 'या' राशींवर शनीदेवाची कृपा, पैशाची आवक वाढेल

SCROLL FOR NEXT