लोकसभा निवडणूक (lok sabha election 2024) काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना एका नवख्या आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती त्याच्याच गृह बुलढाणा जिल्ह्यात झाली आहे. या नियुक्तीवर विरोधकांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे (election commission) तक्रार दाखल केली आहे. बुलढाणा जिल्हा परिषदेचे सीईओ विशाल नरवाडे (buldhana zilla parishad ceo vishal narwade) यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी देखील निवेदनात करण्यात आली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
विशाल नरवाडे हे बुलढाणा जिल्ह्यातील धाड या गावचे रहिवासी आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात म्हणजे एक महिन्यापूर्वीच त्यांच्याकडे बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी आली.
खरंतर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कुठल्याही अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला त्याच्या स्वतःच्या जिल्ह्यात निवडणूक काळात नियुक्ती दिली जात नाही. विशाल नरवाडे यांची नियुक्ती निवडणुकीच्या तोंडावर झाल्याने त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय आजाद हिंद संघटना व विरोधकांनी केली आहे. (Maharashtra News)
विशाल नरवाडे हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील धाड या गावचे रहिवासी आहे तर त्यांचे वडील एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी ही आहेत. त्यामुळे विशाल नरवाडे यांच्या नियुक्तीने आगामी लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांवर प्रभाव पडू शकतो व आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ शकतं असे राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केेलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.