दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागातून मुंबईला दैनंदिन धावणाऱ्या पाच रेल्वे सध्या परभणीमार्गे उपलब्ध आहेत. या रेल्वेमध्ये आता जनशताब्दी एक्सप्रेसची (jan shatabdi express) भर पडणार आहे. यामुळे परभणीकरांना मुंबईसाठी (parbhani to mumbai train) आता सहावी दैनंदिन रेल्वे उपलब्ध हाेणार आहे. यामुळे परभणीकरांचा मुंबईचा प्रवास अजून सुखकर हाेणार आहे. (Maharashtra News)
रेल्वेने नुकतेच जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेसचा (Mumbai-Jalna-Mumbai Jan Shatabdi Express) याचा विस्तार हिंगोली रेल्वे स्टेशनपर्यंत करण्याचे निश्चित केले आहे. येत्या काही दिवसांत ही रेल्वे हिंगोली- मुंबई असे धावेल.
याचा रेल्वेचा फायदा परभणी जिल्ह्यातील प्रवाशांना हाेणार आहे. प्रवाशांना परभणीहून आता दररोज मुंबईला जाण्यासाठी जनशताब्दीच्या माध्यमातून सहावी रेल्वे मिळणार आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभाग नांदेड अंतर्गत सध्या आदिलाबाद मुंबई नंदिग्राम, लिंगमपल्ली - मुंबई देवगिरी, नांदेड - मुंबई राज्यराणी, नांदेड- मुंबई तपोवन आणि नांदेड पनवेल अशा पाच एक्सप्रेस दररोज धावतात.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यातील पनवेल रेल्वे परळी, लातूर रोड मार्गे तर उर्वरित चार रेल्वे पूर्णा, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाडमार्गे धावतात. आगामी काळात जनशताब्दीचा विस्तार हा हिंगोलीपर्यंत हाेणार असल्याने या रेल्वेचा पूर्णा, वसमतला थांबा मिळणार असल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.