Ravikant Tupkar : लोकसभा निवडणुकीसाठी आता गावागावात 'निर्धार परिवर्तन अभियान', विराेधकांच्या पायाखालची वाळू सरकली : रविकांत तुपकर

Nirdhar Parivartan Yatra : मला नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळू लागला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत निश्चित परिवर्तन हाेईल असा विश्वास रविकांत तुपकर यांनी नमूद केले.
nirdhar parivartan yatra will begin from tommorow in buldhana decleares ravikant tupkar
nirdhar parivartan yatra will begin from tommorow in buldhana decleares ravikant tupkarsaam tv
Published On

Buldhana :

बुलढाणा जिल्ह्यात उद्यापासून (ता. ७ मार्च) रविकांत तुपकर (ravikant tupkar) यांच्या 'निर्धार परिवर्तन अभियान' (nirdhar parivartan yatra) याला प्रारंभ हाेणार आहे. या अभियानाअंतर्गत पुढील ८ दिवस रविकांत तुपकर यांचे शिलेदार बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील (buldhana lok sabha constituency) प्रत्येक गावात जावून गावातील प्रत्येक नागरिकांशी संवाद साधणार आहेत. (Maharashtra News)

चिखली येथील मौनीबाबा संस्थान येथे घाटावरील प्रमुख पदाधिकारी व समर्थकांची बैठक नुकतीच झाली. या बैठकीस माेठ्या संख्येने शेतकरी देखील उपस्थित हाेते. रविकांत तुपकर म्हणाले मला नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळू लागला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत निश्चित परिवर्तन हाेईल.

nirdhar parivartan yatra will begin from tommorow in buldhana decleares ravikant tupkar
Mumbai-Jalna-Mumbai Jan Shatabdi Express : परभणीकरांना मुंबईसाठी मिळाली सहावी दैनंदिन रेल्वे,जनशताब्दीचा पूर्णा, वसमतला थांबा

आता 'एक नोट एक वोट' या नुसार जिल्ह्यात परिवर्तन घडविण्याचा निर्धार केल्यानेच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यावेळी उपस्थितांनी तन-मन-धनाने आम्ही तुमच्या सोबत आहोत असे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नमूद केले.

'निर्धार परिवर्तन अभियान' ७ मार्च पासून हे सुरू होणार आहे. या अभियानांतर्गत पुढचे सात दिवस रविकांत तुपकर यांचे समर्थक प्रत्येक गावात पोहोचणार आहेत. नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. आगामी लोकसभेत परिवर्तनाचा निर्धार या अभियानात केला जाणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

nirdhar parivartan yatra will begin from tommorow in buldhana decleares ravikant tupkar
Lonavala Crime News : वेताळबाबा टेकडीवर पाेलिसांचा छापा, जुगार खेळणा-या नऊ जणांना अटक, लाखाचा मुद्देमाल जप्त

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com