स्पर्धा परीक्षा एक जुगार ? SaamTv
महाराष्ट्र

स्पर्धा परीक्षा एक जुगार ?

स्वप्नील लोणकर या MPSC उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या आईने दिलेली प्रतिक्रिया सरकारला जाग आणण्यासाठी पुरेशी आहे. एमपीएससीच्या परिक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी नसल्याच्या तणावातुन आणि आर्थिक परिस्थितीमुळे स्वप्नीलने गळफास घेत आपलं जीवन संपवलंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सागर आव्हाड

पुणे : अनेक जण उराशी स्वप्न बाळगून स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. मात्र वर्षामागून वर्षे उलटून जातात आणि हाती काहीच लागत नाही. हे एक जळजळीत सत्य आहे. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, दरवर्षी निघणाऱ्या रिक्त पदांच्या जाहिराती व त्यांच्या तुलनेत दरवर्षी स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, वाढत जाणारे वय, एकामागून एक देण्यात येणारे अटेम्प्ट मात्र हाती न येणारं यश, वयानुसार येणारा तणाव या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर स्पर्धा परीक्षा हे एक शैक्षणिक जुगार आहे असं म्हणल्यास अतिशयोक्ती वाटायला नको. Competitive exam a gamble?

ऐन उमेदीच्या काळात आयुष्यातील पाच-सहा वर्ष दावणीला बांधून, कसून मेहनत करणारी हि गावखेड्यातून आलेली विद्यार्थी मंडळी सततच्या प्रयत्नातून देखील यशापर्यंत पोहचता आलं नाही कि मग त्यांच्या मनात नैराश्य घर करायला लागतं. सामाजिक आणि कौटुंबिक प्रश्न मनात घर करू लागतात आणि संयम सुटला की, अनेक जण थेट टोकाचं पाऊल उचलतात. अशीच एक घटना पुण्यात घडली अन स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

स्वप्नील लोणकर या MPSC उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या आईने दिलेली प्रतिक्रिया सरकारला जाग आणण्यासाठी पुरेशी आहे. एमपीएससीच्या परिक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी नसल्याच्या तणावातुन आणि आर्थिक परिस्थितीमुळे स्वप्नीलने गळफास घेत आपलं जीवन संपवलंय. आत्महत्या करण्याअगोदर त्याने सुसाईड नोट लिहून अनेक प्रश्न उपस्थित केलेय. त्यात महत्त्वाचा उल्लेख म्हणजे MPSC एक मायाजाल आहे, त्यात पडू नका हे त्या सुसाईड नोटचं हेडिंग !

यशाच्या शिखराकडे जाण्यासाठी लहानाचं मोठं केलेल्या लेकराने आत्महत्या केल्यानं स्वप्नीलच्या आई वडिलांना मोठा धक्का बसलाय. वरील व्हिडिओत त्याच्या कुटुंबियांकडून अश्रू ढाळत आलेली प्रतिक्रिया सरकारचे डोळे उघडण्यासाठी आणि नैराश्य कोणत्या टोकाला घेऊन जाईल हे सांगण्यासाठी पुरेशी आहे.

स्वप्नीलचे आई वडील पुण्यातील शनिवार पेठेत बिल बुक बनविण्याचा व्यवसाय करतात. स्वप्नील हा स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केल्यावर स्पर्धा परीक्षाकडे वळला होता. एमपीएससीच्या २०१९ च्या पुर्व व मुख्य परिक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र त्याची मुलाखत दिड वर्षांपासून कोरोनामुळे रखडलीय. त्यांनंतर आणखी एक पूर्व परीक्षा पास होऊनही मुख्य परीक्षेची वाट तो पाहत होता. त्यातच आत्महत्या केल्याची बातमी पसरताच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जाऊ लागलाय.लवकरच मुख्यमंत्री यांच्या बरोबर बैठक घेऊन निर्णय करू असे मागासवर्गीय आयोगाचे सदस्य यांनी सांगितलं.

स्वप्नीलसह त्याच्या कुटुंबासारखे आज अनेक कुटुंब या परिस्थितीशी दोन हात करताय. कोरोनामुळे सर्वच घटक पिचलेले आहेत. मात्र, सर्वसामान्य जनतेला राजकारणाचं काहीही पडलेलं नसून त्यांना मानसिक आणि आर्थिक आधाराची अपेक्षा आहे. आत्महत्या केलेल्या स्वप्नील सारख्या अनेक तरुण-तरुणींची अवस्था गंभीर झालीय. कोरोनामुळे लॉकडाऊन आणि लॉकडाऊनमुळे नैराश्य आणि नैराश्यातून टोकाचे पाऊल हा प्रवास विचार करायला भाग पाडणारा आहे. त्यामुळे वेळीच ही गंभीर परिस्थिती सावरण्यासाठी तज्ज्ञांसह सरकारनं पाऊले उचलण्याची गरज आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Land Scam: ठाण्यात जमीन घोटाळा; २०० कोटींची जमीन ३ कोटीत लाटली, वडेट्टीवारांचा शिंदेंच्या मंत्र्यावर आरोप

Maharashtra Live News Update : राज्याचा पारा घसरला, पुण्यासह मुंबई गुलाबी थंडीने गारठले

Jupiter Retrograde 2025: 11 नोव्हेंबरपासून 'या' राशींची होणार बल्ले-बल्ले; गुरु वक्री होऊन देणार पैसा

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT