MPSC: संर्सगजन्य आजाराला विद्यार्थी बळी का पडतात?

साधारण २००७ पासून MPSC बद्दल तरुणांमध्ये आकर्षण वाढायला लागलं. त्यानंतर MPSC परिक्षेसाठी वातावरण तयार होऊ लागले आणि विद्यार्थी ग्रामिण भागातून मोठ्या प्रमाणात पुण्या- मुंबई सारख्या शहरात येऊ लागले.
MPSC: संर्सगजन्य आजाराला विद्यार्थी बळी का पडतात?
MPSC: संर्सगजन्य आजाराला विद्यार्थी बळी का पडतात? Saam Tv

प्रविण ढमाले

साधारण २००७ पासून MPSC बद्दल तरुणांमध्ये आकर्षण वाढायला लागलं. त्यानंतर MPSC परिक्षेसाठी वातावरण तयार होऊ लागले आणि विद्यार्थी ग्रामिण भागातून मोठ्या प्रमाणात पुण्या- मुंबई सारख्या शहरात येऊ लागले. जसे जसे विद्यार्थी MPSC परिक्षांकडे वळू लागले तशी या क्षेत्रातील स्पर्धा सुरू झाली. आज संपुर्ण महाराष्ट्रात MPSC चं वातावरण अतिशय भयानक झालेलं आहे. काही बुद्धिप्रामाण्यावादी आणि स्पर्धा परिक्षाची तयारी करणारे विद्यार्थी याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. हीच गोष्ट आता तरुण मुलांच्या आयुष्याचं बरबादीचं कारण ठरत आहे. काल पुणे शहरात याच MPSC ने एका तरुण चोविशितल्या स्वप्नील लोणकर नामक भावी अधिकाऱ्याचा जिव घेतला. याच पार्श्वभूमीवर MPSC चं वास्तव सर्वांसमोर आणावं असं आम्हाला वाटतं.

विद्यार्थी स्पर्धा परिक्षेकडे कसे वळतात?

ग्रामिण भागातील एकादा तरुण शिक्षण सुरु असताना किंवा शिक्षण संपल्यानंतर MPSC कडे वळतो. असा एकच नाही तर हजारे तरुण या परिक्षेकडे वळण्याचा निर्णय घेतात. ते कसे? पास झालेल्या अधिकाऱ्यांची भाषणं घडवून आणली जातात. आपण अधिकारी होण्या अगोदर आपला प्रवास किती खडतर होता तरीही मी कसा अधिकारी झालो हे रंगवून सांगितलं जातं. त्याचं बरोबर स्पर्धा परिक्षेचं अर्धवट चित्र रंगवलेलं एखादं बाजारु पुस्तक विद्यार्थी वाचतात. त्याचबरोबर अधिकारी झाल्यानंतरच्या मिळाणाऱ्या गोष्टी हे सर्व ऐकून विद्यार्थी याकडे वळतात आणि तिथेच चूक करुण बसतात. १० तास १२ तास अभ्यास, जिद्द, चिकाटी, मेहनत, सातत्य, सहनशिलता आणि मग 'यश' असे काही शब्द बोलून विद्यार्थांच्या आकांक्षा फुलवल्या की शिक्षण घेऊण सुशिक्षीत बेकार झालेले विद्यार्थी स्पर्धा परिक्षेकडे वळू लागतात.

MPSC: संर्सगजन्य आजाराला विद्यार्थी बळी का पडतात?
#MpscSwapnilLonkar सरकारनी आमच्या भावाचा खून केला

विद्यार्थी चूकतात कुठे?

एखादं पुस्तक वाचताना किंवा एकादं भाषण ऐकताना (मग ते कोणाचंही असो) विद्यार्थी त्या व्यक्तीच्या जागी आपल्याला ठेवतो आणि विचार करु लागतो. त्या व्यक्तीच्या जिवनात घडणाऱ्या घटना, प्रसंग विद्यार्थी आपल्या जिवनाशी जोडू लागतो. मग त्या गोष्टीमधून विद्यार्थी साम्य शोधू लागतो. बऱ्याच वेळा पुस्तकातील व्यक्ती किंवा भाषण करणाऱ्या अधिकाऱ्याच्या गोष्टीत साम्य आढळते. आणि इथेच विद्यार्थी फसतो. आपल्या क्षमता न ओळखता तो स्पर्धा परिक्षेकडे वळतो. लाल दिवा, खाकी वर्दी, मिळणारा सन्मान यासारख्या गोष्टी समोर ठेऊन तरुण मुलं-मुली अभ्यास करु लागतात आणि खूप काळानंतर समजतं की आपल्याला ही गोष्ट जमू शकत नाही आणि मग तिथून सुरुवात होते नैराश्याला. काही विद्यार्थी त्यातून सुखरुप सुटतात तर काही त्या जगात गुरफटून जातात. आणि मग यश नाही मिळालं की आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात.

परिक्षेतील जागांचं वास्तव

कोरोनाचा आजार जसा संर्सगजन्य आहे तसाच MPSC नावाचा संर्सगजन्य आजार मागच्या १० वर्षापासून विद्यार्थांमध्ये बळावत आहे. आपली पात्रता आणि मर्यादा प्रत्येकाला ज्ञात असते. तरीही विद्यार्थी या संर्सगजन्या आजाराला बळी पडतात आणि कधीही न मिळणाऱ्या यशाच्या पाठीमागे पळू लागतात. ४००-५०० जागांसाठी जवळपास चार लाखाच्या आसपास अर्ज येतात. 'जागा कमी आणि जिवघेणी परिक्षेची स्पर्धी जास्त'. या ४००-५०० जागांसाठी अभ्यास करणारी मुलं ही कष्टकरी, शेतकरी, कुटूंबातील तसेच सर्वसामान्या कुटूंबातून आलेली असतात. १०० टक्क्यांपैकी १ टक्के विद्यार्थी परिक्षा पास होतात बाकी राहिलेले ९९ टक्के विद्यार्थी पुन्हा त्याच जोशात तयारीला लागतात. या संपुर्ण स्पर्धेत वाढते वय, निराशा, घराची जबाबदारी, पैशाची चणचण, सामाजिक जबाबदारी या सर्व गोष्टींची जाणिव होऊ लागते आणि मग सुरु होते नकारात्मकतेशी लढाई. या ४००-५०० पास झालेल्या भावी अधिकाऱ्यांना तरी लगेच कुठं नोकरी मिळते. त्यांनाही नोकरी मिळवायला झगडावं लागतच की. त्यामुळेच विद्यार्थांनी स्पर्धा परिक्षेच्या जागांच वास्तव आणि आपली क्षमता तपासून स्पर्धा परिक्षेकडे वळणं शहाणपणाचं.

MPSC: संर्सगजन्य आजाराला विद्यार्थी बळी का पडतात?
#MPSCबळीस्वप्नीललान्यायद्या

स्पर्धा परिक्षा आणि कोचिंग क्लासेस

संपुर्ण महाराष्ट्रात कोचिंग क्लासेसचा बाजार आहे. तरीही ग्रामिण आणि निमशहरी भागातून विद्यार्थी शहरात येत असतात. तरुणांना पुण्यातील क्लासेस विषयी भयंकर आर्कषण असते. सुरुवातीला क्लासेसवाले एखाद्या पास झालेल्या अधिकाऱ्याचं 'प्रवेश विनामुल्यच्या' नावाखाली भाषण ठेवतात, मग त्या भाषणात तो अधिकारी एखादा क्यास का भारी हे पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो. स्पर्धा परिक्षांमध्ये क्लास कसे मार्गदर्शकाची भूमिका बजावतात हे विद्यार्थांना पटवून दिलं जातं. क्लासमधून किती IAS, IPS, IRS, DC, DYSP झाले हे रंगवून सांगितले जातं. अनेक क्लासेसच्या ठिकाणी काही बोलकी माणसे बसविली जातात आणि ती पुन्हा पुन्हा क्लास कसा आणि का गरजेचा आहे हे मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत असतात. पहिलं तरी फक्त पदवीचं शिक्षण पुर्ण झाल्यानंतर विद्यार्थी क्लास लावायचे पण त्यातून क्लास वाल्यांच पोट भरत नसावं म्हणून त्यांनी १० वी १२ वी च्या तरुणांना फाऊंडेशन बॅचच्या नावाखाली या चिखलात ओढलं. बस स्टॅापवर तसेच शहरातील विविध ठिकाणी मोठ मोठे फ्लेक्स लावून विद्यार्थांची मनं वळवली जातात. त्यामुळे आपली सदसदविवेक बुद्धी वापरुण या गोष्टी आपल्यासाठी खरच गरजेच्या आहेत का याचा विचार करणं गरजेचं आहे.

एखाद्या गोष्टीत आपल्याला निराशा आल्यानंतर माणूस विषेशत: आजची तरुण पिढी पटकन हार मानते आणि टोकाचं पाऊल उचलते. याच मानसिकतेवर लढा देण्यासाठी नक्की कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत आपण पाहूयात.

* संवाद वाढवावा, मन खंबीर बनवा

* सगळ्याशी मनमोकळे बोला

* मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठि डॉक्टर, समुपदेशक, मानसोपचार तज्ञ यांच्याशी संपर्क साधा

* एकलकोंडेपणापासून दूर राहा

* पुस्तके वाचा, चित्रपट पहा, फिरयाला जा

* जगण्याचा मनसोक्त आनंद घ्या

पुण्या-मुंबई सारख्या शहरात अनेक विद्यार्थी आपलं नशिब आजमावत आहेत. पुण्याची सांस्कृतीक शहर अशी असलेली ओळख सध्यातरी MPSC हब म्हणून झालेली आहे. आता एक सुजान नागरिक म्हणून स्पर्धा परिक्षेकडे वळणाऱ्या प्रत्येक विद्यार्थाने विचार करुण या क्षेत्राकडे पाऊल टाकलं पाहिजे. कारण उमेदीची ४-५ वर्षे निघून गेल्यानंतर येणारा ताण तुमचं जिवन संपवू शकतो. स्वप्नील लोणकर हे ताजं उदाहरण. #MPSCबळीस्वप्नीललान्यायद्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com