#MpscSwapnilLonkar सरकारनी आमच्या भावाचा खून केला

Swapnil Loankar
Swapnil Loankar
Published On

सातारा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परिक्षेत पास होऊन अजूनही नोकरी न मिळाल्याच्या तणावातुन स्वप्नील सुनील लोणकरने (Swapnil Lonkar) आत्महत्येचे पाऊल उचलले. स्वप्नील याने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली होती. काबाड कष्ट करुन आपल्याला चांगले शिक्षण देऊनही आपण आई-वडिलांसाठी, कुटुंबासाठी काहीच करु शकत नाही याचे शल्य अनेकांच्या मनात आहे. त्यातूनच युवा पिढी आत्महत्या करीत आहे. सरकारने हे एमपीेएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी सा-याच क्षेत्रातून जाेर धरु लागली आहे. युवा पिढी समाज माध्यमातून सरकारवर जाेरदार प्रहार करीत आहे. स्वप्नील सारख्यांच्या अजून किती आत्महत्या सरकार करायला लावणार असा प्रश्न उपस्थित करीत आहे. (netizens-criticizes-maharashtra-government-on-death-of-mpsc-student-swapnil-lonkar)

समाज माध्यमातून युवा पिढीबराेबरच अनेक जण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackreay), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह अनेक राजकीय पुढा-यांना टॅग करुन त्यांच्यावर प्रश्नांची ताेफ डागत आहेत.

Swapnil Loankar
#MPSCबळीस्वप्नीललान्यायद्या

उद्धव माने यांनी याप्रकरणी सरकारला जाब विचारला आहे. ते म्हणताहेत दळभद्री सरकार ,,,,,3 वर्ष झालं पोरांना नोकरी नाहीत करता काय तुम्ही ,,,नुसते पैसे खातात ,,जर तुमच्या पोराला mpsc करायला लावा मग कळेल अजित दादा पवार ,,,,माननीय मुख्यमंत्री जर अधिवेशनाच्या अगोदर निर्णय झाला नाही तर अधिवेशन होऊ देणार नाही ,,

स्वप्नील लोणकर या MPSC च्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली.पूर्व व मुख्य परीक्षा पास होऊनही मुलाखत झाली नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आदित्य आणि पार्थच्या राजकीय भविष्याची चिंता आहे पण MPSC च्या मुलांच काहीही देणं घेणं नाही अशी भावना शिवतजे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Swapnil Loankar
वीजबिले भरुन ग्रामपंचायतींना आर्थिक बळकट करा : उदयनराजे

आज एक उमदा अधिकारी शासनाच्या फालतू कारभारामुळे महाराष्ट्राने गमावला. आता तरी जबाबदारी घ्या. नाहीतर महाराष्ट्रात कोविड १९ ने कमी आणि एमपीएससी या आजाराने जास्त मृत्यू होतील अशी भिती संकतेकुमार आैताडेने व्यक्त केली आहे.

Swapnil Loankar
भारत फोर्ज कडून सातारा जिल्ह्यातील २४ गावांना लाखो रुपयांचे साहित्य

महाराष्ट्र सरकारनी आमच्या भावाचा खून केला अशीही भावना एकाने व्यक्त केली आहे.

Swapnil Loankar
सातारा जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रावर 144 कलम लागू

कदाचित सरकारला यापुढे सत्तेत तर नाहीच,पण विरोधी पक्षात पण बसायची इच्छा नाहीये... म्हणुन हे सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहे अशी भावना संदीप गरकाल यांनी व्यक्त केली आहे.

आता आमच्या आत्महत्याची वाट पाहत आहेत का.? MPSC च्या मुलांनी केली,आता महावितरण मधील विद्यार्थी बाकी राहिले ते मेले का तुमचे समाधान होईल, लाज वाटली पाहिजे फक्त मंत्री पदाचा आनंद घेत आहेत एक रुपयाचे काम करीत नाही,

शेतकरी आत्महत्यानंतर आता बेरोजगार आत्महत्या सुरू होतील मुलांचं वय वाढत चाललाय आणि दुसरीकडे साधी परीक्षासुद्धा घेतली जात नाहीये स्वयंघोषित प्रतिनिधीनो तुमच्या अविचारी कृत्यामुळे परीक्षा पुढे जात राहतील आणि असेच मुल वैतागून आत्महत्या करतील अशी भिती चंद्रकांत इंगळे यांनी व्यक्त केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com