clothes loaded truck catches fire near pandharpur Saam Digital
महाराष्ट्र

पंढरपूर कुर्डूवाडी मार्गावर भीषण अपघात, कपड्यांनी भरलेला ट्रक जळून खाक; 80 लाखांचे नुकसान

Pandharpur Accident News : या अपघातामुळे पंढरपूर कुर्डूवाडी मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक आता सुरळीत केली.

भारत नागणे

पंढरपूर जवळ मालवाहतूक ट्रक आणि कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये कपड्याने भरलेला ट्रक जळून खाक झाला आहे. तसेच ट्रेलर देखील जळाला आहे. यामुळे लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे. (Maharashtra News)

हा अपघात आज पहाटेच्या सुमारास पंढरपूर पासून जवळ असलेल्या आढीव गावाजवळ घडला आहे. अपघातानंतर स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आग मोठी असल्याने कपड्याने भरलेला ट्रक जळून खाक झाला आहे.

यामध्ये सुमारे 70 ते 80 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातामुळे पंढरपूर कुर्डूवाडी मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक आता सुरळीत केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विधानपरिषदेत जनसुरक्षा विधेयक मंजूर

Train Accident : कर्जतजवळ मालगाडी रुळावरून घसरली; मुंबई- पुणे रेल्वे मार्ग ठप्प, नेमकं काय घडलं?

धक्कादायक! सापासोबत स्टंटबाजी करनं महागात पडलं; ३० वर्षीय तरुणाचा कोब्राच्या दंशाने मृत्यू|VIDEO

Ashram School : आदिवासी आश्रम शाळेतील १३ विद्यार्थीना विषबाधा; पाच विद्यार्थीनी गंभीर, रुग्णालयात उपचार सुरु

Railway OHE Poles : रेल्वे ट्रॅकजवळील पोलवर असलेल्या या आकड्यांचा अर्थ काय? जाणून घ्या नेमकी माहिती

SCROLL FOR NEXT