Nashik Encroachment Row Saam Tv
महाराष्ट्र

Nashik News: अनधिकृत दर्गा हटवण्याआधी तणाव, मध्यरात्री पोलिसांवर दगडफेक; अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर; २२ पोलिस जखमी

Nashik Encroachment Row: नाशिकच्या काठेगल्ली परिसरात असलेली अनधिकृत दर्गा हटवण्यापूर्वीच मोठा गोंधळ उडाला. रात्री उशिरा जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. या वेळी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे नाशिकमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

Priya More

नाशिकच्या काठेगल्लीमध्ये असलेली अनधिकृत दर्गा हटवण्याआधीच रात्री उशिरा जोरदार राडा झाला. ही दर्गा हटवण्याआधीच नाशिकमध्ये तणाव निर्माण झाला. जमाने पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये २२ पोलिस जखमी झाले तर अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. सध्या पोलिस बंदोबस्तात पहाटोपासून दर्ग्या हटवण्याचे काम सुरू आहे. सध्या काठे गल्ली परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काठेगल्ली परिसरात असलेली अनधिकृत दर्गा हटवण्याची कारवाई आज केली जाणार होती. पण काल रात्रीच याबाबत अफवा पसरली आणि काही नागरिकांनी काठेगल्ली गाठली. वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे जमाव आणखी आक्रमक झाला. हा दर्गा हटवण्याआधीच अफवा पसरवण्यात आली. काठेगल्लीमध्ये रात्रई ५०० पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी ४०० पेक्षा जास्त लोकांचा जमान त्याठिकाणी एकाचवेळी आला. जमावाने आक्रमक होत पोलिसांवर दगडफेक केली यामध्ये अनेक पोलिस जखमी झाले.

जमावाने केलेल्या दगडफेकीमध्ये २ सहाय्यक पोलिस आयुक्त आणि २० हून अधिक पोलिस कर्मचारी जखमी जखमी झाले. एका पोलिस कर्मचाऱ्याचा पाय फ्रॅक्चर झाला. दगडफेक करणाऱ्या जमावातील काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. ८ पेक्षा अधिक जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिस सध्या या तणावपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी सध्या काठेगल्ली परिसरातील वाहतूक मार्गात अनेक बदल केले आहेत.

नाशिक महानगर पालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत दर्ग्याला १ एप्रिल रोजी नोटीस बजावली होती. स्वत:हून ही अनिधिकृत दर्ग्याचे बांधकाम काढून टाका नाही तर तोडकाम करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. पण पालिकेने दिलेली मुदत संपली त्यामुळे १५ एप्रिल म्हणजे आजपासून अनधिकृत दर्गा पाडण्याचे काम पालिकेकडून सुरू करण्यात आले आहे. मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही दर्गा पाडण्याचे काम सुरू आहेत. दर्गा परिसरातील १०० मीटरच्या अंतरावर बॅरिकेडींग करण्यात आले आहे. कोणालाही आत जाण्याच परवानगी नाही. दुपारपर्यंत हा अनधिकृत दर्गा हटवण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT