Nashik News : नाशिकच्या नितीनचा मृत्यू DJमुळे नव्हे तर 'या' कारणामुळे, मोठं कारण आलं समोर...

DJ in Nashik Causes Death of Young Boy : डीजे सुरू असताना अचानक तरूणाच्या नाकातून आणि कानातून रक्तस्राव झाला. त्यानंतर त्याला तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्याची प्राणज्योत मालवली.
 Panchavati youth death due to DJ
Panchavati youth death due to DJSaam Tv News
Published On

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिक : डीजेच्या आवाजामुळे एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीत डीजे सुरू असताना हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. डीजे सुरू असताना अचानक तरूणाच्या नाकातून आणि कानातून रक्तस्राव झाला. त्यानंतर त्याला तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्याची प्राणज्योत मालवली. ही धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली असून, पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, आता त्या तरुणाच्या मृत्यूचं खरं कारण समोर आलं आहे.

नाशिकच्या पंचवटी परिसरात असलेल्या महात्मा फुले नगर येथे काल रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने डीजे लावण्यात आला होता. मात्र, डीजेच्या आवाजाने नितीन रणशिंगे (वय २३) वर्षीय युवकाला त्रास झाल्यानं त्याच्या नाकातून आणि तोंडातून रक्त येऊ लागले. त्यानंतर त्याला तात्काळ नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.

 Panchavati youth death due to DJ
Nagpur Crime : चोरीच्या प्रकरणात वाठोडा पोलिसांनी दोघांना केली होती अटक; तपासात धक्कादायक माहिती आली समोर

डीजेच्या आवाजाने नितीन रणशिंगे याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र, पंचवटी पोलिसांनी अधिक तपास करून गेल्या चार वर्षांपासून गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या नितीनचा मृत्यू झाल्याचा पोलीस तपासात समोर आलं आहे. नाशिकच्या एका खासगी रुग्णालयामध्ये नितीनवर गेल्या चार वर्षांपासून उपचार सुरू होते. मात्र, तो सध्या नाशिकमध्ये त्याच्या घरी असताना त्याला अधिकचा त्रास होऊ लागला, आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पंचवटी पोलिसांनी दिली आहे.

 Panchavati youth death due to DJ
Nagpur Crime : चोरीच्या प्रकरणात वाठोडा पोलिसांनी दोघांना केली होती अटक; तपासात धक्कादायक माहिती आली समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com